तुमच्या मुलांना आवडणारे रंगीत पापड सुरक्षित आहेत का? खायला देण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची माहिती

मुलांना रंगीत पापड खायला देण्यापूर्वी ते सुरक्षित आहेत का, कृत्रिम रंगांचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि FSSAI काय सांगते, हे जाणून घ्या.
Tamil Nadu's Coloured Papad Ban: What Parents Need to Know

Tamil Nadu's Coloured Papad Ban: What Parents Need to Know

sakal

Updated on

तामिळनाडू सरकारने जास्त प्रमाणात कृत्रिम रंग वापरून बनवलेल्या रंगीत पापडांच्या उत्पादन, साठवण, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत काही उत्पादक पापड अधिक आकर्षक दिसावेत म्हणून परवानगी नसलेले कृत्रिम रंग वापरत असल्याचं आढळलं. हे रंग FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) च्या नियमांच्या विरोधात असल्याने सरकारने ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com