

Saint Dnyaneshwar’s Metaphor of Lord Ganesha’s Tusk
Sakal
डॉ. यशोधन साखरे
आळंदी
रोजच्या जीवनामध्ये अनेकदा वाद-विवादास सामोरे जावे लागते. तो कधी कौटुंबिक पातळीवरचा, तर कधी दोन देशांमधील म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असतो. या वाद-विवादाचे कारण कधी कधी परिस्थिती असते, मात्र अनेकदा संवादाचा अभाव अथवा किंवा चुकीच्या पद्धतीने साधला गेलेला संवाद हा वाद-विवादांच्या मागचे कारण असते.