अर्थपूर्ण पर्स : नियोजनाला पर्याय नाही

घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि जबाबदाऱ्या सांभाळत काटकसरीतून उभी राहिलेली ‘अर्थपूर्ण पर्स’, नियोजन, संयम आणि विश्वासाच्या जोरावर साध्या गृहिणीने शिकलेले अर्थकारण
Household Budget Planning helps families manage expenses, build savings and achieve long-term financial stability.

Household Budget Planning helps families manage expenses, build savings and achieve long-term financial stability.

sakal
Updated on

कविता खटावकर

एक काळ असा होता, की स्त्रिया फक्त चूल आणि मुलांच्या विश्वातच रमायच्या. आजही माझी आई सहजपणे म्हणते, ‘‘अगं, मला काय कळतं त्यातलं?’’ विशेषतः पैशांच्या बाबतीत अनेक स्त्रिया स्वतःहूनच मागे राहायच्या; पण माझ्या आयुष्यात मात्र परिस्थितीने मला आर्थिक व्यवस्थापनाचे धडे अगदी जवळून शिकवले. लग्नानंतर घराची आर्थिक परिस्थिती फारशी सुस्थितीत नव्हती. नवऱ्याचा पगार बँकेचे हप्ते, सोसायटीचे खर्च आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये जात असे. उरलेली रक्कम तो माझ्या हातात देत असे आणि त्या पैशांत संपूर्ण महिना सांभाळायचा असे. घरभाडे, पाहुणचार, सासू-सासऱ्यांची औषधे, मुलांच्या गरजा, घरखर्च - सगळ्याचे नियोजन त्या मर्यादित पैशांत करावे लागायचे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com