अर्थपूर्ण पर्स : बचत : सुखी संसाराचा योग्य मार्ग

आजीकडून शिकलेली छोट्या छोट्या बचतीची सवय गल्ल्यातील दहा रुपयांपासून मोत्याच्या माळेपर्यंत, संसाराचा गाडा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया ठरतो
Saving Money Tips

Saving Money Tips

Sakal

Updated on

प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा

बचत नेहमीच माझ्या आवडीचा विषय. अगदी लहानपणापासूनच आजीच्या संस्कारात छोट्या छोट्या बचती कशा करायच्या, हे शिकायला मिळालं. रविवारच्या बाजारामध्ये मी भाजी विकायला जायची. त्या विकायच्या, बाजार करायचा आणि मग घरी आल्यानंतर आजी दहा रुपये द्यायची. ते दहा रुपये मातीनं बनवलेल्या गल्ल्यात टाकायचे. तो गल्ला कधी भरेल या विचारानं प्रत्येक वेळी उत्साहात काम करायचं आणि कामाचा मोबदला त्या गल्ल्यात टाकायचा, असा प्रघात होता. त्यामुळे कोणतंही काम न लाजता प्रामाणिकपणे करण्याची सवय तर लागलीच; पण तो विनाकारण खर्च करायचा नाही याची चांगलीच सवय लागली आणि ती सवय आयुष्यभर सोबत बनून राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com