झकास बियर्ड लुक 

झकास बियर्ड लुक 

मित्रांनो, जुन्या व हल्लीच्याही सर्व चित्रपटांमध्ये हिरो क्लिन शेव्हमध्ये दिसतात. ते ढलेल्या दाढीत फारसे दिसत नाहीत. चित्रपटात त्यांचा ब्रेकअप झाला असेल, तरच ते वाढलेल्या दाढीत दिसतात. आता मात्र, मुलांमध्ये दाढी वाढवण्याची फॅशन इन आहे. सध्या लॉकडाउनमुळे सर्व सलून बंद असल्याने मुलं दाढीत वेगवेगळे लुक ट्राय करत आहेत. 

दाढी म्हणजे मुलांसाठी ‘आण, बाण और शान’! काही मुलांना क्लिन शेव्ह आवडते, तर काहींना वाढलेली दाढी. लॉकडाउनमुळे अडचण होत असली, तरी सध्या दाढीला कात्री वा ट्रिमर न लावण्याचा ट्रेंड फॉलो केला जातोय. फ्रेंडली मटण चॉप्स, मीडिअम व लॉंग स्टबल, फुल बियर्ड, सर्कल बियर्ड, स्पॅरो, वॅन डायक, डकटेल, गॅरीबाल्डी, बॅनडोल्ज ही सगळी भन्नाट नाव ऐकून तुमच्या भुवया उंचावल्या असतीलच! ही नावे आहेत ढीच्या विविध स्टाईलची आणि सध्या मुलांमध्ये ती लोकप्रिय आहेत. तुम्हाला एक गंमत सांगू? दाढीच्या काही प्रकारांना लोकांच्या नावांवरून देखील नाव पडली आहेत. वाचून आश्‍चर्य वाटलं असेल ना! ‘एरिक बॅनडोल्ज’ नावाच्या तरुणावरून बॅनडोल्ज हे नाव पडलं, तर चित्रकार ॲन्थनी वॅन डायक यांच्या लुकवरून वॅन डायक नाव पडलं. 

दाढीतला मुलांचा लुक रुबाबदार दिसतो. वाढवलेल्या दाढीला घरातल्या घरात आकार देणं सोपं आहे. तसेच ती वाढवणं सोपं असलं, तरी काळजी घेणं तितकंच कठीण. दाढी वाढवताना विशेष काळजी घेतली पाहिजे. दाढी नियमित धुतली पाहिजे, तसेच चमकदार दिसण्यासाठी दररोज कंगवा देखील फिरवला पाहिजे बरं का! 

१) मीडिअम स्टबल आणि बॅनडोल्ज हा दाढीतला प्रकार मुलांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. दाढी आणि मिशी ट्रीम करून तुम्ही मीडिअम स्टबल हा लुक मिळवू शकता. बॅनडोल्ज प्रकारात मिशी व दाढी खूप वाढलेली असते. तिला गोल आकार दिला जातो. या लुकमध्ये रणवीर सिंग व शाहीद कपूर दिसला होता. 

२) दाढी सुंदर दिसण्यासाठी बियर्ड शॉम्पू आणि कंडिशनरही वापरू शकता. 

३) दाढीचे केस निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्‍चराईज करणे आवश्यक आहे. 

४) दररोज कंगवा फिरवायला विसरू नका. 

५) बियर्ड लुकवर गॉगल छान दिसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com