esakal | प्रिंटेड कुर्ती- पॅंट सेट 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रिंटेड कुर्ती- पॅंट सेट 

कुर्तीची फॅशन आता चांगलीच रुजली आहे आणि त्यात सातत्याने अनेक बदल, प्रयोग होत आहेत. पण, त्यामधील नवीन फॅशन हटके आहे. नवीन आलेल्या ट्रेंडनुसार सध्या बाजारात चलती आहे ती ‘प्रिंटेड कुर्ती’ सेटची. 

प्रिंटेड कुर्ती- पॅंट सेट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

फॅशनची सर्वसाधारण व्याख्या हीच की, आपण परिधान करत असलेले कपडे एकमेकांशी मिळतेजुळते असावेत. टॉप आणि बॉटम अशा दोन मुख्य प्रकारांचा विचार करता त्यामध्ये साम्य असावे किंवा त्या दोघांचा ताळमेळ असावा, यावर आपण भर देतो. मात्र, अशी फॅशन किंवा ट्रेंड कायम राहील याची शाश्‍वती नाही. शिवाय बदलत्या फॅशनचा आपणही स्वीकार करायलाच हवा. कुर्तीची फॅशन आता चांगलीच रुजली आहे आणि त्यात सातत्याने अनेक बदल, प्रयोग होत आहेत. पण, त्यामधील नवीन फॅशन हटके आहे. नवीन आलेल्या ट्रेंडनुसार सध्या बाजारात चलती आहे ती ‘प्रिंटेड कुर्ती’ सेटची. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रिंटेड कुर्ती- पॅंट सेट 
प्रिंटेड कुर्ती बाजारात आधीही उपलब्ध होत्या. कदाचित प्रिंटेड या  प्रकाराची मागणीही सर्वाधिक आहे. पण, मग आता त्यामध्ये काय नावीन्य आहे? प्रिंटेड कुर्ती यापूर्वी पाहिलीच असेल, पण सध्या फॅशनमध्ये आलेल्या ट्रेंडनुसार कुर्ती आणि पॅंट हे दोन्ही प्रिंटेड असल्याचे पाहायला मिळते. बॉटम ही स्ट्रेट पॅंट किंवा प्लाझो असू शकते. हा संपूर्ण सेट प्रिंडेट असल्याचे दिसते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हे नक्की करा... 
- प्रिंटेड कुर्ती सेटमध्ये एकावेळी संपूर्ण ड्रेस मिळतो, तो घ्यावा 
- त्यामुळे कुर्ती किंवा पॅंटसाठी वेगळी शोधाशोध करण्याची चिंता मिटते. 
- प्रिंटेड कुर्ती सेटसोबत ओढणी घेताना ड्रेसच्या रंगाची मात्र प्लेनच असावी. 
- प्लेन ओढणी या संपूर्ण सेटला शोभून दिसेल. 
- ड्रेसमध्ये प्रिंट किंवा डिझाईनची भर असल्याने अॅक्सेसरीज शक्यतो कमीच घाला. 
- झुमके, लोंबते कानातले हा लुक पूर्ण करण्यास मदत करतील. 
- प्रिंटेड ड्रेस असल्याने प्लेन आणि ओव्हरसाईज अशी हॅंडबॅग कॅरी करा. 
- इतर कोणत्याही फ्लॅट्स, हिल्सपेक्षा मोजडी उठून दिसेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा