Fashion
Fashion

फॅशन + : टॉपच्या दुनियेत..

फॅशनमध्ये सतत काहीतरी नवीन येतच असते. प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असणारा आणि रोजच्या वापरासाठी सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार म्हणजे ‘टॉप’. डेली वेअर, ऑफिस, आउटिंग आणि जवळपास सर्वच ठिकाणी वापरला जाणारा फॅशनमधला प्रकार म्हणजे ‘टॉप’. सध्या काही काळापासून अगदी ट्रेंडमध्ये असणारा क्रॉप टॉप प्रत्येक मुलीकडे असावाच. जाणून घ्या क्रॉप टॉपचे विविध प्रकार आणि त्यासोबत करायची फॅशन!

ऑफ शोल्डर 
ऑफ शोल्डरची फॅशन आता चांगलीत रुळली आहे. ऑफ शोल्डर म्हणजेच या टॉपचे हात हे खांद्यावर असतात. हा टॉप थोडासा बोल्ड असला, तरी कधीतरी ट्राय करण्यास काहीच हरकत नाही. ऑफ शोल्डरचा क्रॉप ट्रॉप हा अतिशय ट्रेंडी लुक आहे. हायवेस्ट जीन्सवर, स्कर्टवर, पॅरेलल पॅंट किंवा प्लाझोवर हा टॉप हटके दिसतो. या टॉपसाठी ॲक्सेसरीज असणे गरजेचे आहे. लहान कानातले आणि गळ्यामध्ये लांब गळ्यातले घाला. केसामुळे टॉपची स्टाइल झाकू शकते त्यामुळे पोनीटेल, वन साइड वेणी किंवा बनच्या स्वरूपात बांधा.

बेल स्लिव्हज्
बेल स्लिव्हज् म्हणजेच टॉपच्या बाहूंना फ्लेअर आणि लेअर असते. या टॉपचे हात लांब आणि मोकळे असतात. नेहमीच्या क्रॉप टॉपपेक्षा हा टॉप वेगळा आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत पण, खास करून ‘व्ही नेक’ चा टॉप हा आकर्षक दिसतो. तसेच, हाय वेस्ट जीन्ससोबत पेअर अप केल्यास लुक परफेक्ट होईल. हातांच्या स्टाईलमुळे हा टॉप वेगळा आहे आणि त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला, पार्टीला किंवा ऑफिसलादेखील हा टॉप परिधान करता येईल.

हाय नेक 
हाय नेक क्रॉप टॉप प्रत्येक सीझनसाठी उत्तम पर्याय आहे. या टॉपचे मटेरिअल अतिशय मऊ आणि आरामदायी असते. हायनेक, अर्थात उंच गळ्याचे किंवा मानेभोवती असणारे टॉप. यामध्ये हाफ आणि फुल अशा हातांचे टॉप उपलब्ध असतात. स्कर्ट किंवा हायवेस्ट जीन्सवर हा टॉप शोभून दिसतो. पार्टीवेअर, आउटिंग, फिरण्यासाठी हा टॉप कॅरी करू शकता. कोणत्याही दागिन्यांशिवाय परिधान केल्यास अधिक उठून दिसेल. मोकळ्या केसांपेक्षा पोनीटेल किंवा बन चांगला दिसेल. 

हॉल्टर नेक
हॉल्टर नेक या प्रकारात टॉप हा मानेभोवती बांधलेला किंवा मानेपासून निलंबित केलेला क्रॉप टॉप. खांद्याचा आणि मानेचा भाग यामध्ये दिसतो. नेहमीच्या टॉपपेक्षा थोडासा हटके लुक तुम्हाला देईल. पार्टी, आउटिंग आणि बाहेर फिरण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शॉर्ट्स, स्कर्ट, जिन्स किंवा पॅरेलल पॅंटवर हा टॉप उठून दिसेल. मोठे रिंगचे कानातले आणि मोकळे केस लुक पूर्ण करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com