फॅशन टशन : क्लासी सॅटिन सिल्क साडी

माधुरी सरवणकर-तेलवणे
Wednesday, 3 June 2020

सॅटिन सिल्क साडी म्हटलं की, आठवते ती शिल्पा शेट्टी, जुई चावला, माधुरी दीक्षित अन् रविना टंडन. या सर्व जणींच्या नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये आपल्याला या साडीचा ट्रेंड पाहायला मिळतो. बेल बॉटम पॅन्ट, लेगिन्स आणि इतर जुन्या स्टाईलप्रमाणे या साडीचा ट्रेन्ड पुन्हा आलेला आहे. भरपूर सेलिब्रिटी अवॉर्ड फंक्शनमध्ये या साडीला कॅरी करीत आहेत. तुम्ही फेस्टीव्ह सिझनमध्ये हेवी साडी परिधान करणे पसंत करत नसाल, तर हा पर्याय तुमच्यासाठी भारीच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

    ही साडी इंडो वेस्टर्न लुक देते. तसेच, तिला एक विशिष्ट शाईन असते. त्यामुळे परिधानावर तुम्ही एलिगंट दिसाल. 
    या साडीचा लुक ब्लाऊजवर अवलंबून आहे बरं का! ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचा असेल तर खूपच छान. 
    ब्रोकेड, सिक्वेन्स, नेटे फॅबरिकचा ब्लाऊज यावर पेअर करा. तसेच, पॅटर्न निवडताना हाय नेक, फुल स्लिव्ज, सिव्हलेस निवडू शकता. यामुळे तुमचा फेस्टीव्ह लुक अधिक चांगला दिसेल. 
    शक्यतो साडीवर येणारा मॅचिंग रंगाचा ब्लाऊज परिधान करणे टाळाच. 
    बॉटल ग्रीन रंगावर व्हाईट, गोल्ड रंगावर पिंक किंवा ब्लॅक  रंगातील सिक्वेन ब्लाऊज यावर कडक दिसतात. 
साडीच्या रंगातही तुम्ही प्रयोग करू शकता. आजकाल मार्केटमध्ये या साड्यांमध्ये विविध रंग उपलब्ध आहे आणि सर्वच रंग इतके अप्रतिम आहेत की पाहताच क्षणी आपण त्यांच्या प्रेमात पडतो. ही साडी तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या हटके स्टाईलने ड्रेप करण्याचा प्रयत्न करा. पॅन्ट साडी म्हणजेच डबल क्रॉल साडी तुम्ही घालू शकता. 

इकडंही लक्ष द्या... 
१. ही साडी शायनी असल्याने जास्त ज्वेलरी घालू नका.
२. यावर तुम्ही वेस्ट बेल्ट कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक बोल्ड दिसेल. 
३. या साडीला अधिक फॅन्सी बनविण्यासाठी त्याला सिंपल किंवा हेवी बॉर्डर लावू शकता. 
४. या लुकसोबत हेवी मेकअप छान दिसतो. तुमची साडी लाइट रंगाची असेल, तर बोल्ड मेकअप ट्राय करा. 
५. हेअर स्टाईल करताना केस मोकळे ठेवून त्याला थोडा वेव्ही लुक द्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article madhuri sarvankar on fashion