लाइफस्टाइल कोच - सिमला मिरची आणि पेरु

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 4 August 2020

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे. अशा घटकांची माहिती आपण घेत आहोत. प्रामुख्याने ‘अ’,‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ ही जीवनसत्त्वे आणि आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनियम‌, फोलेटसह दर्जेदार प्रथिनयुक्त पदार्थ आहारात असले पाहिजेत.

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे. अशा घटकांची माहिती आपण घेत आहोत. प्रामुख्याने ‘अ’,‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ ही जीवनसत्त्वे आणि आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनियम‌, फोलेटसह दर्जेदार प्रथिनयुक्त पदार्थ आहारात असले पाहिजेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिमला मिरची
सिमला मिरचीमध्ये ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे ती एक चांगली अँटी ऑक्सिडंटही आहे. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे असतात. एक सिमला मिरची एका व्यक्तीची दिवसभराची ‘क’ जीवनसत्वाची गरज भागू शकते. लाल आणि पिवळी सिमला मिरची अधिक पिकत असल्यामुळे त्यांच्यामध्ये हिरव्या मिरचीपेक्षा अधिक पोषक घटक असतात. त्यामुळे ‘क’ जीवनसत्वाचा खजिनाच असलेल्या सिमला मिरचीला आहारात अवश्य स्थान द्या.

 • सिमला मिरचीमध्ये‌‌ फोलेट, पोटॅशियम आदी‌ खनिजांसह आयर्न, ब ६, ई आणि के ही जीवनसत्त्वेही असतात.
 • ॲनिमिया रोखण्यात सिमला मिरची उपयुक्त ठरते. (‘क’ जीवनसत्त्व आणि आयर्न हे घटक एकत्रितरित्या त्यासाठी कार्य करतात.)
 • सिमला मिरचीमुळे त्वचाही निरोगी, तजेलदार राहण्यास मदत होते.
 • डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठीही सिमला मिरची चांगली आहे.
 • कर्करोग रोखण्यास तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठीही सिमला मिरचीचे सेवन उपयुक्त ठरते.
 • तुम्ही तुमच्या ‘अँटी एजिंग लिस्ट’मध्येही सिमला मिरचीचा समावेश करा.

पेरु -

 • पेरुही सिमला मिरचीप्रमाणेच ‘क’ जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे. एक पेरू एका संत्रीपेक्षाही अधिक ‘क’ जीवनसत्व पुरवतो.
 • तो प्रतिकार शक्ती वाढवून आजार संसर्गापासून आपले रक्षण करतो.
 • पेरूतही अॅंटी ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते.
 • पेरूमध्ये पोटॅशियमचे प्रमाणही भरपूर असते.
 • हृदयाचे आरोग्य सुधारण्याबरोबरच रक्तदाब सामान्य ठेवण्यातही पेरू महत्त्वाची भूमिका बजावतो.
 • पेरूमध्ये असलेल्या ‘अ’ जीवनसत्वामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
 • पेरुतील फोलेट गर्भारपणात आवश्यक असते.
 • रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी पेरूचे सेवन लाभदायक ठरते.
 • त्वचा निरोगी ठेवण्याबरोबरच पेरू कर्करोगाचा धोकाही कमी करतो.
 • पेरूमधील फायबरमुळे आतड्यांची व्यवस्थित हालचाल होऊन बद्धकोष्ठतेला आळा बसतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article manisha bandisthi on Shimla Chili and guava