'मेनोपॉज'मध्येही मला शरीरसंबंध ठेवावेसे वाटायचे, पण तो...

जागतिक मेनोपॉज दिवस साजरा होत असताना स्त्रीयांनी स्वत:च्या शारीरिक बदलांबाबत जागृत होणं आवश्यक आहे.
मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण मानला जातो. मात्र, आजही काही समुदायांमध्ये याला आजार म्हणून पाहिलं जातं.
मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण मानला जातो. मात्र, आजही काही समुदायांमध्ये याला आजार म्हणून पाहिलं जातं.

मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण मानला जातो. मात्र, आजही काही समुदायांमध्ये याला आजार म्हणून पाहिलं जातं. या काळात महिलांची आपसुक वाढणारी चिडचिड नकारात्मक पद्धतीने घेतली जाते. मेनोपॉजच्या प्रक्रियेत महिलांना मानसिक आधाराची गरज असते. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं जातं. आज जागतिक मेनोपॉज दिवस साजरा होत असताना मेनोपॉज हा आजार नसून जगण्यातील एक शारीरिक बदल आहे, हे सर्व पिढ्यांना सांगणं आवश्यक आहे. 'सकाळ'ने यासंबंधी काही महिला आणि तज्ञांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तारुण्यात सुरू झालेल्या मासिक पाळीपासून ते स्त्रीची प्रजनन क्षमता संपेपर्यंतचा हा काळ मोठा असू शकतो. मेनोपॉज येणं हे स्त्रीयांच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असतं. त्यामुळे याची काही ठरलेली किंवा अधिकृत कालबाह्यता नसते. काळानुरुप शरीरात होणारे बदल याला कारणीभूत असतात. अनेकदा मेनोपॉजची प्रक्रिया सुरू असताना स्त्रीयांना मानसिक बदलातून सामोरे जावे लागते. या दरम्यान, मूड स्विंग्ज होणं, अचानक स्वभावात लहरीपणा येणं, फार कमी वेळात आवडीनिवडींविषयीची मतं बदलणं,इ या घटना पुन्हा पुन्हा घडू शकतात. यासोबतच हार्मोनल चेंजेस जाणवतात. त्याचा प्रभाव शारीरिक पातळीवर पडतो.

याचसोबत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर स्त्रीयांना शारीरिक संबंध ठेवण्यात काहीही रस उरत नाही, असा समज आहे. किंवा प्रजनन क्षमता संपल्यानंतर महिलांची सेक्स करण्याची इच्छा मरते, असा गैरसमज पसरवला जातो. मात्र, याबद्दल सेक्सोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ वेगळं मत मांडतात. आज जागतिक मेनोपॉज दिवस साजरा होत असताना स्त्रीयांनी स्वत:च्या शारीरिक बदलांबाबत जागृत होणं आवश्यक आहे. या बदलांची माहिती घेणं आणि त्यापासून सुदृढ आयुष्य जगण्याकडे वाटचाल करणं हीच गुरुकिल्ली आहे.

आज जागतिक मेनोपॉज दिवस साजरा होत असताना स्त्रीयांनी स्वत:च्या शारीरिक बदलांबाबत जागृत होणं आवश्यक आहे.
आज जागतिक मेनोपॉज दिवस साजरा होत असताना स्त्रीयांनी स्वत:च्या शारीरिक बदलांबाबत जागृत होणं आवश्यक आहे.

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) म्हणजे काय?

मेनोपॉजला क्लायमॅक्टेरिक म्हणूनही ओळखले जाते. महिलांच्या आयुष्यातील अशी वेळ आहे, जेव्हा मासिक पाळी कायमस्वरुपी थांबते. त्यानंतर महिला मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम राहत नाहीत. मेनोपॉज साधारणपणे 49 ते 52 वर्षांच्या दरम्यान येतो. वैद्यकीय पातळीवर याचे परिक्षण करण्याचे मार्ग आहेत. साधारणत: सलग १२ महिने मासिक पाळी न आल्यास मेनोपॉज आल्याचं स्पष्ट होतं. मेनोपॉज साधारणपणे 45 वर्षांच्या जवळपास येऊ शकतो. हे सरासरी वय आहे.

मेनोपॉज साधारणपणे 49 ते 52 वर्षांच्या दरम्यान येतो
मेनोपॉज साधारणपणे 49 ते 52 वर्षांच्या दरम्यान येतो

मेनोपॉजमध्ये मला सेक्स करावसं वाटायचं, पण तो...

मेनोपॉजमध्ये स्त्रीयांना कोणत्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, याबद्दल 'सकाळ'ने महिती घेण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील एका उच्च मध्यवर्गीय कुटुंबातील ४८ वर्षांच्या महिलेने यासंदर्भात वाट मोकळी केली. माझी मासिक पाळी संपून जवळपास चार वर्षे झाली. मात्र, सुरुवातीच्या काळात मला काही बाबींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला, असे या महिलेने सांगितले. कारण मासिक पाळी थांबल्यानंतर नवऱ्याने सेक्स करायला नका दिला.

मासिक पाळी सुरू होताना काय करावं, कसं वागावं हे आईने शिकवलं होतं. लहान असताना महिन्यातील ४ दिवस मी घरीच थांबायचे. माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायलाही जात नव्हते. शाळेत जाण्यासाठी माझा नकार असायचा. पोटात वेदना व्हायच्या. इतके दिवस कुठे होतीस, हे विचारल्यानंतर मी खोटं कारण देत होती. पण कालांतराने पालकांनी आणि माझ्या वयातील मुलींनी समज दिल्यानंतर हे गैरसमज दूर झाले.

मासिक पाळी सुरू होताना माहिती देण्यासाठी कोणीतरी होतं. पण ती बंद होत असताना काय करावं, हे विचारण्यासाठी मला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. सतत होणारी चिडचिड, कौटुंबीक वाद यातून शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती. अखेर मी आणि पतीने मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. मला त्यावेळी सेक्स करावसं वाटत होतं. पण नवऱ्याला हे मान्य नव्हतं. मासिक पाळी संपल्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्याला त्याचा विरोध होता. अखेर डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आम्ही यावर काम केलं.

डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आम्ही शारीरिक संबंधावर काम केलं.
डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आम्ही शारीरिक संबंधावर काम केलं.

मेनोपॉजनंतर सेक्स करावं का?

मेनोपॉज आल्यानंतर स्त्रीया शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्याचा समज अनेक समुदायांमध्ये आहे. त्याचप्रमाणे महिलेचे सेक्स करण्याचे कौशल्य लूप्त होत असल्याची भावना पुरुषांमध्ये आहे. मात्र, सेक्सोलॉजिस्ट डॉ. विवेक बिलमपल्ली यांनी यासंदर्भात महत्वाचे खुलासे केले आहेत. मेनोपॉजनंतर महिलांना पुरुषांसोबत संबंध ठेवायला काहीही हरकत नसते. उलट बाळंतीण राहण्याची भीती कमी झालेली असते. त्यामुळे पिल्स घेण्याचा धोकाही संपतो. यामुळे अनेक स्त्रीयांना मेनोपॉजनंतरचे शारीरिक संबंध आणखी सुरक्षित वाटतात.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनोपॉजनंतर स्त्रीयांची प्रजनन क्षमता संपते. सेक्स करण्याची क्षमता नाही, असे डॉ. बिलमपल्ली यांनी स्पष्ट केले. प्रजनन क्षमता संपणं म्हणजेच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचं कौशल्य संपणं, असा चुकीचा अर्थ सामाजात रुढ आहे. याआधी स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून संबोधली जात होती. त्यामुळे स्त्रीचा उपयोग फक्त पुढील पिढी जन्माला घालण्यासाठी आहे, असे गैरसमज होते. अशा वेळी प्रजनन क्षमता संपल्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास पुरुष नकार देत होते. मात्र, हे गैरसमज आपण दूर केले पाहिजे. मेनोपॉजनंतरही सेक्स करण्याची इच्छा जागृत होण्यात काहीच गैर नाही, असं मत डॉ. बिलमपल्ली यांनी व्यक्त केलं.

मेनोपॉजनंतर सुधारित सेक्स ड्राइव्ह मिळल्याचे अनुभव अनेक महिलांनी शेअर केल्याचं ते सांगतात. गर्भधारणेसोबतच स्त्रीयांवर कायम लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडते. मात्र मेनोपॉज नंतरचे शारीरिक संबंध या जबाबदाऱ्या कमी करतात. त्यामुळे महिलांना आराम मिळतो आणि जोडीदारासोबत संबंध दृढ करायला मदत होते, असे सेक्सोलॉजिस्ट सांगतात.

मेनोपॉजनंतरही सेक्स करण्याची इच्छा जागृत होण्यात काहीच गैर नाही, असं मत डॉ. बिलमपल्ली यांनी व्यक्त केलं.
मेनोपॉजनंतरही सेक्स करण्याची इच्छा जागृत होण्यात काहीच गैर नाही, असं मत डॉ. बिलमपल्ली यांनी व्यक्त केलं.

जाणून घ्या... 'मेडिकल सायन्स'!

मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हे घटक कमी झाल्यामुळे महिलांमध्ये शारीरिक बदल होतात. त्याचा परिणाम लैंगिक इच्छा बदलण्यामध्ये होतो. अनेकदा मेनोपॉजनंतर सहजपणे उत्तेजित होण्यात अडणची येत असल्याचं महिलांना जाणवतं. यासाठी स्पर्श आणि संवेदनशीलता कारणीभूत असू शकते. त्यामुळे सेक्स करण्यातील रस कमी होऊ शकतो. तसेच इस्ट्रोजेनच्या कमी पातळीमुळे शारीरिक संबंधांमध्ये वापर होणाऱ्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे आरामदायक शारीरिक संबंधांसाठी महिलांचे शरीर नकारात्मक सिग्नल देऊ शकते. याचा थेट परिणाम स्त्रीच्या लैंगिक स्वारस्याच्या पातळीवर होत असतो. मात्र, या शक्यता आहेत. तसेच शारीरिक संबंध प्रस्थापिक करण्याची इच्छा कोणत्याही वयात होणं, यात काही गैर नाही, अशी माहिती डॉ. विवेक बिलमपल्ली यांनी दिली.

गर्भाशयातील अंड्यांची घटणारी संख्या कारणीभूत?

गर्भाच्या आयुष्यात सुमारे 6 दशलक्ष ते 7 दशलक्ष अंडी असतात. या काळापासून, नवीन अंडी तयार होत नाहीत. जन्माच्या वेळी, अंदाजे 1 दशलक्ष अंडी असतात; आणि तारुण्यापर्यंत, फक्त 3 लाख शिल्लक असतात. यापैकी केवळ 300 ते 400 अंडी स्त्रीच्या प्रजनन क्षमतेसाठी उपयुक्त असतात. उर्वरित अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी झाल्यामुळे स्त्रीची वयानुसार प्रजनन क्षमता कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com