Ashoka Tree Benefits : या झाडाची साल तुम्हाला मधुमेहाच्या गराड्यातून बाहेर काढेल; विश्वास ठेवा फरक पडेल!

मधुमेहासाठी अशोकाच्या सालीचा उपयोग
Ashoka Tree Benefits
Ashoka Tree Benefits esakal

Ashoka Tree Benefits : असाध्य आजार मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हा एक आजार आहे जो योग्य जीवनशैली आणि आहाराने नियंत्रित केला जाऊ शकतो. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधे देखील वापरली जातात. बाजारात अनेक औषधे उपलब्ध असली तरी त्यांचा वापर करून वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.

पण ही औषधे दीर्घकाळ घेतल्याने यकृत आणि किडनी खराब होते. येथे आम्ही मधुमेहामध्ये अशोकाच्या झाडाच्या सालाचे फायदे आणि उपयोग सांगणार आहोत. घराभोवती अशोकाचे झाड सहज सापडेल.(Ashoka Tree Benefits : Control diabetes with Ashoka's bark, know its surprising benefits)

Ashoka Tree Benefits
Diabetes Tips : मधुमेही रुग्णांनी Coconut Water चं सेवन करावं का?

या वृक्षाला अशोक या नावाने देखील ओळखले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये अशोकाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. हा सदाहरित वृक्ष असून, उंची साधारणतः ६ ते १० मीटर असते. पाने १५-२० सेंमी लांब, संयुक्त प्रकारची, पर्णिकेच्या ४-६ जोड्या, लांबट निमुळत्या आकाराची असतात.

फुलांचे झुपके नारंगी किंवा नारंगी- पिवळ्या रंगांचे असतात. शेंगा चपट्या, चिवट असून त्यात लांबट गोलाकार ४-८ बिया असतात. या वृक्षाची सावली अत्यंत दाट असते. त्यामुळे याची लागवड बागेत, मंदिराबाहेर तसेच शाळेभोवताली केली जाते.

मधुमेहासाठी अशोकाच्या सालीचा उपयोग

अशोकाच्या सालामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी अशोकाची साल पावडर आणि जामुन पावडर सम प्रमाणात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करावे. याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. (Diabetes)

Ashoka Tree Benefits
Diabetes Risk Factors: आता येणार या भयंकर रोगाची लाट? २०५० पर्यंत दिड कोटी लोक होणार शिकार!

याशिवाय अशोकाची साल पावडर कडुनिंबाची साल पावडर समप्रमाणात मिसळून १०० ग्रॅम पाण्यात मिसळून एक उष्टा बनवा, हा उष्मा अर्धा राहिल्यावर गॅस बंद करा. या उकडीचे रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

त्वचेच्या समस्या

अशोकाच्या झाडाच्या सालीचे आपण सेवन केले तर आपले रक्त सुध्द होण्यास मदत होते. तसेच यामुळे तेलकट त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये जवळपास सर्वचजण कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात. जर आपण हिवाळ्यामध्ये अशोकाच्या झाडाच्या सालीचे सेवन केले तर कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मासिक पाळीची समस्या

मासिक पाळीमध्ये अनेकांना कंबरदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यावेळी आपण अशोकाच्या झाडाची साल पावडर करून कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिल्याने बराच आराम मिळतो.

लठ्ठपणाची समस्या

अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर तयार करा. दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये ही पावडर आणि मध मिक्स करून प्या. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, जर हे खाय पेय पिल्यावर आपल्याला मळमळ होत असेल तर हे पिणे बंद करा आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या. (Health Tips For Diabetes)

Ashoka Tree Benefits
Walking Health Tips : तुरू तुरू नाहीतर हळू हळू चालणं ठरेल फायद्याचं, Diabetes, Heart Attack ची करेल सुट्टी!

मूळव्याधाची समस्या

जर आपल्याला मुळव्याधाची समस्या असेल तर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर खाल्ले पाहिजे. यामुळे मुळव्याध कमी होण्यास मदत मिळते.

अशोक सालीचे फायदे काय आहेत?

 • अशोकाची साल संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर आहे.

 • अशोकामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे संक्रमणाचा प्रसार रोखतात.

 • पोटातील कृमींच्या समस्येवर अशोकाची साल फायदेशीर आहे.

 • अशोकाच्या सालीचे पाणी प्यायल्याने पोटातील जंत संपतात.

 • अशोकाची साल अतिसार रोखण्यास मदत करते.

 • तुरट गुणधर्मामुळे ते आतडे चांगले ठेवते.

याची साल काढताना काळजी घ्या कारण...

 1. अशोकाचे झाड साधारणपणे १० ते १२ वर्षांनी साल काढण्यास तयार होते.

 2. साल काढताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

 3. झाडाच्या वयानुसार साल काढणे गरजेचे आहे.

 4. साल काढल्यांतर त्याचे तुकडे करून सावलीत सुकवावेत. (Tree)

याचे इतर इतर फायदे

 1. अशोक मधुर, सुगंधी, रक्तदोषनाशक आहे.

 2. झाडाची साल कडू/तुरट असून तिचा उपयोग पोटदुखी, स्त्रीरोग, अतिसार, कृमी, सूज, जळजळ, अस्थिव्यंग, मूत्रविकारांवर केला जातो.

 3. पित्त तसेच रक्तातील दोष व रक्तविकारावर सालीचा वापर केला जातो. (साल बाहेरून खडबडीत व आतून लाल असते).

 4. फुलाचा रस अतिसारावर उपयुक्त असतो. फुलाचे चूर्ण रक्तस्रावावर व मूत्रविकारात उपयोगी पडते.

 5. औषधे - अशोकारिष्ट, अशोकघृत, देवदाव्यारिष्ट, महामरिच्यादि तेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com