Asmita Deshmukh : ‘कॉटनचे साधे ड्रेस आवडीचे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asmita Deshmukh

Asmita Deshmukh : ‘कॉटनचे साधे ड्रेस आवडीचे’

अस्मिता देशमुख : खरंतर मला सर्व प्रकारचे ड्रेस परिधान करायला आवडतात; पण सर्वांत जास्त मला कॉटनचे ड्रेस, साडी आणि फ्रॉक्स जास्त आवडतात. अगदी सणवार असतील किंवा कार्यक्रम असेल किंवा बाहेर फिरायला जातानादेखील मी कॉटनचे पोशाख वापरते. कारण, माझ्या व्यक्तिमत्त्वाला कॉटनचे साधे ड्रेस खूप सूट करतात.

फॅशन करताना किंवा कोणतेही ड्रेस परिधान करताना आपण त्यात कम्फर्टेबल असणे खूप महत्त्वाचे असते. जोपर्यंत ड्रेस आपल्याला पूर्ण फिटिंगमध्ये बसत नाही, तोपर्यंत आपल्याला सकारात्मक वाटत नाही. आपण व्यवस्थित कपडे परिधान केले, अन् ते आपल्या स्वतःलाही आवडले, तर त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. 

मी ‘झी टीव्ही’वरील ‘देवमाणूस’ या मालिकेत डिंपलची भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला पोशाख निवडताना अन् फॅशन करताना खूप काळजी घ्यावी लागते.

माझ्या शरीरयष्टीला व स्किन टोनला सूट होणाऱ्या रंगांचे पोशाख मला आवडतात. कारण, रंग आपल्याला एक प्रकारे एनर्जी देण्याचे काम करत असतात. त्यातून आपला मूडही ताजा राहतो. खरेतर आपले व्यक्तिमत्व खुलविण्याचा अन् स्वतःला आनंदी ठेवण्यात आवडीच्या व आपल्याला शोभतील अशा रंगांच्या पोशाखांचा मोलाचा वाटा असतो. माझे पोशाख निवडताना मी कोणालाही फॉलो करत नाही; पण माझी आई स्वतः फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे तिने तयार केलेले आउटफिट्स मी खूप आवडीने परिधान करते.

फॅशन टिप्स

तुमची शरीरयष्टी व्यवस्थित दिसेल असे कपडे परिधान करावेत.

तुम्हाला आनंद वाटेल आणि त्यातून सकारात्मकता येईल; तसेच त्यातून कम्फर्टेबल वाटेल, असेच कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्या.

कोणत्या ठिकाण जातोय, तेथे काय समारंभ वा कार्यक्रम आणि तेथील परिस्थिती कशी आहे, हे पाहून त्यानुसार कपडे परिधान करावेत.

आपल्या कपड्यांची तुलना इतरांच्या कपड्यांशी करू नका.

तुम्हाला ज्या रंगाचे आणि फॅशनचे कपडे आवडतात आणि कम्फर्टेबल वाटतात तेच परिधान करा; कारण त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल.