Astro Tips : नोकरी मिळत नसेल तर 'या' युक्त्या 100 टक्के प्रभाव करतील; एकदा ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : नोकरी मिळत नसेल तर 'या' युक्त्या 100 टक्के प्रभाव करतील; एकदा ट्राय करा

अभ्यास आणि लेखन करून चांगली नोकरी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यासाठी लोक मेहनतही घेतात पण कधी कधी काही लोकांना चांगली नोकरी मिळत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, ही परिस्थिती त्यांच्या ग्रहांच्या स्थितीमुळे होते. जे तुम्ही काही उपायांच्या मदतीने ठिक करू शकता. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत.

शनिदेवाची उपासना करा

तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर शनिवारी शनिदेवाची पूजा करू शकता. तसेच 'ओम शनिश्चराय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.

हेही वाचा: कोणत्या बोटाने कपाळावर टिका लावणे शुभ असते?, जाणून घ्या काही खास गोष्टी

मॉं काली देवीची उपासना करा

महिन्याच्या पहिल्या सोमवारी काळे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून मातेला अर्पण केल्यास नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

लिंबूचा होईल उपयोग

वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू-मिरचीचा वापर केला जातो. खूप मेहनत करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही लिंबूमिरची हा उपाय पाहू शकता. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी एक लिंबू घेऊन त्याभोवती लवंग लावा आणि सोबत ठेवा. तुमची निवड होईल.

हरभरा गूळ गायीला खायला द्या

नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी पिठात गूळ आणि हरभरा गुंडाळून गायीला खाऊ घाला. असे केल्याने नोकरीतील अडचणी दूर होतील.

हेही वाचा: कोणत्या बोटाने कपाळावर टिका लावणे शुभ असते?, जाणून घ्या काही खास गोष्टी

Web Title: Astrology Tips Get Job Immediately If You Not Getting These Tricks Will Be 100 Percent Effective

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..