

Self-Identity of Women Ashwini Apte
Sakal
अश्विनी आपटे- खुर्जेकर
Self-Identity : आजच्या आधुनिक, वेगवान आणि सतत बदलणाऱ्या जगामध्ये महिला अनेक भूमिका निभावतात. व्यावसायिक, आई, पत्नी, मुलगी, मैत्रीण, उद्योजिका, नेतृत्व करणारी व्यक्ती या सगळ्या भूमिका निभावताना अनेकदा एक महत्त्वाची गोष्ट मागे पडते- स्वतःची ओळख, स्वतःची इमेज आयडेंटिटी. आपण इतरांसाठी खूप काही बनतो; पण स्वतःसाठी नेमकं कोण आहोत याचा विचार करायला मात्र वेळच उरत नाही.