Old Car Buying Guide: जुनी कार खरेदी करताना या गोष्टी नक्की पडताळून घ्या

Tips for Used Car Buyers: जुनी कार खरेदी करणं म्हणजे अगदी ५ लाखांच्या आतील किंवा साधं मॉडेल असलेली कार खरेदी करणं गरजेचं नाही. अलिकडे अगदी ऑडी, मर्सिडेजसारख्या वापरलेल्या लक्झरी कार देखील बाजारामध्ये रिसेल केल्या जातात
Tips for Used Car Buyers
Tips for Used Car BuyersEsakal

Old Car Buying tips: घरासमोर एखादी कार असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा बजेटमुळे हे स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागतो. अशा वेळी वापरलेली म्हणजेच जुनी कार OLD CAR खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Automobile News what to check before purchasing second hand car

जर तुम्ही थोडाचा अभ्यास करून आणि थोडी माहिती मिळवून जुनी कार Old Car Purchase घेतली तर मोठी बचत होईल आणि तुम्हाला चांगली जुनी मात्र चांगली एखादी कार मिळू शकते. जुनी कार खरेदी करताना थोडा वेळ देणं आणि संयम राखणं गरजेचं आहे.

थोडा रिसर्च करून तसचं कारमधील किंवा गाड्यांबद्दलची माहिती मिळवू न कोणत्या गोष्टी कार खरेदी करताना पडताळणं आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात आल्यानंतर जुनी कार घेणं तुम्हाला सोपं जाईल. शिवाय कमी बजेटमध्ये Budget तुम्हाला चांगल्या कंडिशनमधील किंवा कमी वापर झालेली एखादी चांगली कार घेणं देखील शक्य होईल.

जुनी कार खरेदी करणं म्हणजे अगदी ५ लाखांच्या आतील किंवा साधं मॉडेल असलेली कार खरेदी करणं गरजेचं नाही.

अलिकडे अगदी ऑडी, मर्सिडेजसारख्या वापरलेल्या लक्झरी कार देखील बाजारामध्ये रिसेल केल्या जातात. त्यामुळे तुमचं बजेट थोड जास्त असेल मात्र ते लक्झरी कार घेण्या इतपत नसेल तरी तुम्ही सेकेण्ड हॅण्ड लक्झरी कार देखील खरेदी करू शकता.

या सगळ्यापूर्वी तुम्हाला जुनी कार खरेदी करणं सोप जावं यासाठी आम्ही तुम्हाला जुनी कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेंचं आहे हे सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

Tips for Used Car Buyers
Disadvantages Of Black Car: थांबा! काळी गाडी घेताय? आधी त्याचे तोटे वाचा

१. तुमचं बजेट ठरवा- जुनी कार खरेदी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमचं बजेट ठरवा. जुन्या कारवर तुमची किती खर्च करण्याची इच्छा आहे हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला कार घेणं सोप जाईल. अर्थात बजेट ठरवतं असताना कारवर पुढे येणारा खर्चदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे.

रजिस्टेशन, इन्शुरन्स तसंच जर तुम्हाला गाडीमध्ये काही अपग्रेड करायचं असल्यास तो खर्चदेखील ध्यानात घ्या. तुमचं बजेट ठरलं की गाडी घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

२. कार मॉडेल ठरवा- तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे तसचं त्याचं मॉडेल ठरवा. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या जुन्या कार विकणाऱ्या वेबसाईटची मदत घेऊ शकता. तसचं अलिकडे अनेक ऑटोमोबाईल कंपन्यानी त्यांच्या कंपनीच्या जुन्या गाड्यांच्या विक्रिसाठी वेगळे शोरूम सुरु केलेल आहेत.

शोरुम किंवा वेबसाईटवरून तुम्ही कारचं मॉडल ठरवू शकता. कमी मेंटन्स असलेली किंवा विश्वासार्हता असलेल्या ब्रॅण्डची निवड केल्यास जोखिम कमी होऊ शकते.

३. कारची तपासणी करा- तुम्हाला हवी असलेल्या कारचं म़ॉडेल किंवा कार सापडल्यानंतर ती खरेदी करण्यापूर्वी तिची योग्य तपासणी करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही एखाद्या मेकॅनिकची मदत घेऊ शकता. कारला बाहेरून काही डेमेज नाही ना किंवा कारला आतूनही नीट तपासा.

यासाठी छोटी टेस्ट ड्राईव्ह न घेता किमान १०-१२ किलो मीटर गाडी चालवून पहा. गाडी वेगवेगळ्या स्पीडवर चालवून तपासा. गाडीचे ब्रेक, क्लच. एसी, अॅक्सिलेटर सर्व काही नीट तपासा. गाडीतून कोणताही आवाज येत नाही ना ते तपासा.

४. कारची हिस्ट्री तपासा- कारची हिस्ट्री म्हणजेच इतिहास तपासणं गरजेचं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा प्रतिष्ठित ऑनलाइन पोर्टलवरून तुम्ही कारचा अपघात तर झाला नव्हता ना किंवा त्यावर कोणताही दंड नाही हे तपासू शकता.

तसचं कारच्या इन्शुरस कंपनीकडूनही तुम्हाला याची माहिती मिळी शकते.

हे देखिल वाचा-

Tips for Used Car Buyers
Car Care Tips : अनेक वर्ष वापरूनही गाडी दिसतेय नव्यासारखी? जाणून घ्या काय आहे सिक्रेट!

५. कागदपत्रांची पूर्तता- कार पसंत झाल्यानंतर कारची संपर्ण कागदपत्रं तपासून घ्या. आरसी बुक, इन्श्यूरन्स तसचं कारची वॉरंटी, लोन पूर्ण झालं आहे का? याची सर्व कागदपत्र नीट तपासून घ्या.

तसचं कार खरेदी करतानाही कायदेशीर रित्या योग्य कादपत्रांवरू स्वाक्षऱ्या घेऊन ती खरेदी करा जेणेकरून भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत.

अशा प्रकारे तुम्ही जुनी कार खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला कमी पैशांमध्ये चांगली कार मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com