esakal | तुमचा Ethnic Look होऊ शकतो खराब, टाळा नेहमी होणाऱ्या फॅशन मिस्टेक
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचा Ethnic Look होऊ शकतो खराब, टाळा नेहमी होणाऱ्या फॅशन मिस्टेक

तुमचा Ethnic Look होऊ शकतो खराब, टाळा नेहमी होणाऱ्या फॅशन मिस्टेक

sakal_logo
By
शरयू काकडे

एथनिक लूक आता कोणत्याही सणासूदीला किंवा लग्नसमारंभात नेहमी पाहायला मिळतो. एथनिक लूक करताना कित्येक जण कनफ्यूज असतात पण त्यामुळे ते अशा फॅशन मिस्टेक करतात ज्यामुळे त्यांचा लूक खराब होतो. तुम्ही जर एथनिक लूक करणार असाल तर काही बेसिक गोष्टी कायम लक्षात ठेवा.

हेही वाचा: तुमच्या 'या' चार सवयी गर्लफ्रेंडला ठरु शकतात त्रासदायक

जास्त शायनिंग किंवा हेव्ही एम्ब्रॉडरी टाळा

तुम्ही कोणत्या कारणासाठी तयार होत आहात यावर तुमचा लूक ठरविला जातो, त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, फेस्टिव्ह लूक आणि वेडिंग लूक वेगळा आहे. तुम्ही तुमच्या खास मित्रामैत्रीणींच्या लग्नात, फॅमिली फंक्शनमध्ये तुमचा लूक ब्राईट करू शकता पण, ऑफिसमध्ये कोणत्याही फेस्टिवल किंवा दिवाळी पार्टीसाठी हेव्ही एम्ब्रॉडरी लूक ऐवजी सिल्क, टफैटा सारख्या फॅब्रिकचे आऊटफिट वापरू शकता.

फिटिंग न करणे

कित्येक लोक हेव्ही आऊटफिटची शॉपिंग करतात पण जेव्हा फिटिंग करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आळशीपणा करतात. कशाला उगाच वेळ वाया घालवायचा? फिटिंग केल्यामुळे लूक खराब होईल, असाही विचार काहीजण करतात पण तुम्ही जर कपडे फिटिंग नाही केले तर एखादं झबलं घातल्यासारखे वाटते. त्यामुळे तुमचा लूक हायलाईट होत नाही आणि तुम्ही उधारीवर घेऊन ड्रेस वापरत आहात असे वाटते.

हेही वाचा: काळी पडलेली ताब्यांची भांडी आरशासारखी चमकवा; फॉलो करा या टीप्स

ओव्हर ज्वेलरी

कित्येक लोक ट्रेडिशनल लूकलाच फेस्टिव्ह सीजन लूक समजतात आणि डोक्यापासून बोटांपर्यंत दागदागिणे घालतात. पण असे केल्याने तुमचा लूकच नाही तर तुमची ज्वेलरी हाईलाईट होते. त्यामुळे तुम्ही ट्रेडिनशल आऊटफिट्स सोबत हेव्ही ज्वेलरी वापरू नका.

कलर कॉम्बिनेशन

कित्येक लोक एथनिक ड्रेसवर मिसमॅच जॅकेट किंवा श्रग वापरतात किंवा कॅज्युअल दूपट्टा, किंवा बेल्टमुळे तुमचा लूक खराब होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी करणे टाळा आणि ड्रेसनुसार मॅचिग गोष्टी वापरा

loading image
go to top