
Ram Mandir Pran Pratishtha Varshpurti: २२ जानेवारी २०२४ रोजी मागच्या वर्षी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. हिंदू पंचांगानुसार, ही वर्षपूर्ती 11 जानेवारीला साजरी झाली, परंतु इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 22 जानेवारीला या कार्यक्रमाची वर्षपूर्ती आहे. आजच्या दिवशी अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित करण्यात आल्या आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यासोबतच व्यक्तीला मानसिक शांतता लाभते. चला तर मग, घरीच प्रभू श्रीरामांची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया.