वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय; याचं नियमीत सेवन करा लठ्ठपणा होईल दूर

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय; याचं नियमीत सेवन करा लठ्ठपणा होईल दूर

अति लठ्ठपणा विविध आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण नेहमीच प्रयत्न करत असतो. लठ्ठ होण्यामागे अनेक कारणं आहेत. जसं की प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, आपली बदलती जीवनशैली, तासंतास एकाच जागेवर बसून राहणं आणि व्यायाम न करणे हेदेखील कुठेतरी आजारांना आणि लठ्ठपणाला जबाबदार ठरते. अनेकदा डायटिंग करून आणि जिममध्ये जाऊनही वजन कमी होत नाही. कारण, आपलं खाणं व्यवस्थित नसतं. तासंतास एका जागेवर बसून राहिल्यामुले पोटाचा घेरा वाढतच जातो. ही चरबी कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतोच. पण जिममध्ये गेल्यानंतर आणि डायटिंग केल्यानंतरही लठ्ठपणा कमी होत नसेल तर आयुर्वेदिक उपाय करुन पाहा. त्यामधून तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आयुर्वेदामधील जड़ी-बूटीमध्ये इतकी ताकद आहे की लठ्ठपणाबरोबरच डायबिटीज, हाईब्लड प्रेशर यासारख्या समस्याही दूर होतील. आयुर्वेदामधील अशाच उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत...ज्यामुळे तुमची पोटाची चरबी किंवा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.... महत्वाचं म्हणजे, यामुळे तुम्हाला कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत..

ज्येष्टमध -
इटलीमधील एका रिपोर्ट्सनुसार, नियमितपणे ज्येष्टमधाचं सेवन केल्यास कोणत्याही दुष्परणामाशिवाय चरबी कमी होऊ शकते. यामध्ये असलेल्या फ्लेवोनॉयडमुळे लठ्ठपणा कमी होतो. यामुळे गळ्यात असणारे विषाणूही मरतात.   

कोरफड - 
त्वजा ताजीतवानी ठेण्यासाठी कोरफडीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र, कोरफड वजन कमी करण्यासाठीही तितकीच उपायकारक आहे. कोरफड कापल्यानंतर त्याची जेल/ज्यूस सहजतेने आपण काढू शकतो. कोरफडीत माती, व्हिटामिन, मीठ, एंजाइम, कार्बोहायड्रेट, अमीनो अॅसिड, सेलिसिलिक अॅसिड आणि काही दुसरे पोषक तत्त्व न्यूट्रिएंट्स असतात. यामुळे हे पोषक तत्त्व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीच्या रसा अथवा जेल दोन आठवडे दररोज पिल्यानंतर लठ्ठपणा कमी होईल.  

कडीपत्ता -  
कडीपत्ता हा दररोज स्वंयपाकत वापरला जातो. हे खाण्यातील खूपच गरजेचं साहित्य आहे. जो चवीसोबत खाणं बघण्यासाठीही डिलिशियस बनवतं. कडीपत्ता जर का तुमच्या खाण्यात दररोज वापरल्यास बेड कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवणारे सेल्स देखील कमी करण्याचं काम करतो. हे शरीरातील फॅट जाळण्यात मदत करतो त्यासोबतच हे शरीरात संग्रहीत लिपिड स्तर आणि ट्राइग्लिसराइड्स देखील कमी करतात. 

आद्रक/आलं -
आद्रकामध्ये विविध आरोग्यवर्धक गुण आहेत. याला मधाबरोबर खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. शरिरात असलेलं फॅट कमी करण्यास हा रामबाण उपाय आहे. 

पुदीना -
पुदीना स्वयंपाकघरातील एक औषधी वनस्पती आहे. शरीराच्या विविध तक्रारींसाठी पुदीना उपयुक्त असतो. पुदीन्यामुळे फक्त तुमचं जेवण स्विदिष्ठ बनवत नाही तर पोटाची चरबीही कमी करतं. पुदीनामध्ये कॅलरीची मात्रा कमी करण्यासोबत फायबरही नियंत्रित ठेवण्याची क्षमता आहे. 

मेथी :
मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

मध आणि लिंबू -
वजन नियंत्रित ठेण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचं सेव फायद्याचं ठरतं. ज्याला लिंबामुळे सर्दी होईल अशी भिती वाटतेय त्यानं या मिश्रणात काळी मिर्ची पावडर टाकावी.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com