
डॉ. राजश्री पाटील
शहरी, निमशहरी भागांतील घरांना सज्जा किंवा बाल्कनी हा ‘प्रदेश’ जोडलेला असतो. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या मनोरंजनाचं ठिकाण असतं हे. लहान मुलांना चिऊ काऊचा घास भरविण्याचंही ठिकाण. एकूण काय तर घराचा भाग असलेली; पण स्वतंत्र अस्तित्व असलेली सार्वभौम जागा म्हणजे बाल्कनी.