केळी खरेदी करताय? पण, चुकूनही खाऊ नका अशी केळी, अन्यथा होईल नुकसान

Banana
Bananaesakal
Summary

केळात भरपूर पोटॅशियम, फोलेट, कार्ब आणि ट्रिप्टोफॅन असतात. हे घटक फळात असल्यानं आरोग्यही उत्तम राहतं.

Overripe Banana side effects : केळात भरपूर पोटॅशियम, फोलेट, कार्ब आणि ट्रिप्टोफॅन असतात. हे घटक फळात असल्यानं आरोग्यही उत्तम राहतं. पोषक तत्वांनी समृद्ध असूनही, विशिष्ट प्रकारची केळी आरोग्यासाठी चांगली मानली जात नाहीत. केळी पिकवण्याची एक प्रक्रिया आहे आणि या अंतर्गत हे कळतं, की कोणतं केळ शरीरासाठी चांगलं आहे आणि कोणतं नाही.

जास्त पिकलेली केळी : आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त पिकलेली केळी सर्वात निरुपयोगी असतात. तुम्ही त्या केळाच्या आवरणावरील तपकिरी डागांद्वारे ते ओळखू शकता. केळ जास्त पिकल्यावर त्याचा निरोगी स्टार्च कमी होऊ लागतो आणि ते साखरेत रुपांतर होतं. ओव्हरराइप ब्राऊन केळ्यात साखरेचं प्रमाण 17.4 असतं, तर पिवळ्या रंगाच्या केळात त्याचं प्रमाण 14.4 ग्रॅम असतं.

कमी फायबर असलेली केळी : जास्त पिकलेल्या केळांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. अशा केळात फक्त 1.9 ग्रॅम फायबर आढळतात, तर त्याची मात्रा पिवळ्या केळ्यात 3.1 ग्रॅम असते. एवढच नव्हे, तर फारच पिकलेल्या केळ्यांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतेच, पण त्यात थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन A, B6 आणि व्हिटॅमिन K असते. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी योग्य केळी खाल्ल्या जाऊ शकतात.

Banana
लोक अजूनही मासिक पाळीशी संबंधित 'या' अफवांवर विश्वास ठेवतात

पिवळी केळी : साधारणपणे पिवळ्या रंगाची केळी आरोग्यासाठी चांगली मानली जाते. पिवळ्या रंगाची केळी हिरव्या आणि तपकिरी केळींपेक्षा सुरक्षितही मानली जातात. ती खाण्यास केवळ स्वादिष्टच नाहीत, तर सर्व प्रकारची पोषक तत्त्वे त्यांच्यामध्ये असतात.

हिरवी केळी : हिरवी केळी किंवा अगदी कमी पिकलेली केळी सर्वोत्तम मानली जातात. कारण, त्यात साखर जास्त असते आणि प्रतिरोधक स्टार्चही जास्त असतो. ते खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी देखील ही हिरवी केळी उपयुक्त ठरतात. त्यामध्ये शॉर्ट-चेन फॅटी अॅसिडस् (SCFA) असतात, जे शरीर कायम निरोगी ठेवतात.

डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com