असे सजवा तुमचे किचन; कमी जागेतही दिसेल आकर्षक

Beautiful kitchen
Beautiful kitchenBeautiful kitchen

नागपूर : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली आहे. यामुळे प्रत्येकाच्या घरी साफसफाई सुरू झालेली आहे. दिवाळी हा भारतीयांचा सर्वांत मोठा सण असल्याने रंगरंगोटी, साफसफाई, नवीन कपडे, नवीन वस्तू आदींची खरेदी केली जाते. घराची सफाई करताना जुन्या व तुटफूट झालेल्या वस्तू काढून नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. यात किचनचाही समावेश असतो.

स्वयंपाकघर हा घराचा आत्मा असतो. गृहिणी त्यांची हक्काची जागा असलेल्या किचनला सुंदर बनवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. वर्षभर यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो. दिवाळी आली की साफसफाई अधिक जोर धरते. किचनमध्ये अनेक बदल केले जातात. अनेकांच्या घरी मॉड्युलर किचन आल्यामुळे छान सजावट करता येते. परंतु, ज्यांच्या घरात छोटे किचन आहे, त्यांची मोठी अडचण होते. एकतर लहान किचन त्यातल्या त्यात फ्रीज, टेबल, ओट्यामुळे काम करताना मोठी अडचण होते. तेव्हा कमी जागेत चांगले किचन कसे सजवता येईल, हे आज आपण पाहणार आहोत.

Beautiful kitchen
फूड स्टायलिस्ट म्हणून करा करिअर

सेलो चेकर्स प्लॅस्टिक

किचनमध्ये जेवण बनवताना लागणाऱ्या वेगवेगळ्या डाळी आणि इतर धान्य ठेवण्यासाठी सेलो चेकर्स प्लॅस्टिक पीईटी कॅनिस्टर सेट मिळतो. हा १८ बरण्यांचा सेट असतो. हा सेट एफडीए प्रमाणित पॉलीथिलीन टेरेफथलेटने बनलेला असतो. यात ठेवलेले स्नॅक्स, डाळी, धान्य अगदी ताजे आणि कुरकुरीत राहतात.

क्लीनिंग टॉवेल

किचनची साफसफाई करणे खूप कठीण असते. तेल आणि चिकटपणा घालवण्यासाठी गृहिणींना बरीच मेहनत घ्यावी लागते. एक टॉवेल भांडी पुसणे, हात पुसणे, गरम भांडी पकडणे, साफसफाई करणे यासाठी वापरतात. टॉवेल ओले असल्याने त्यावर जिवाणू अधिक असतात. कोरड्या टॉवेलवर ते कमी असतात. त्यासाठी पिक्सेल होम कॉटनचे सहा किचन क्लीनिंग टॉवेलचा एक संच मिळतो. हे टॉवेल कापसापासून बनलेले असतात.

Beautiful kitchen
‘घाबरू नका’नंतर ‘सोडू नका’; पाकिस्तान संघाला संदेश

किचन रॅक होल्डर

किचनमध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळे मसाले आणि पावडर ठेवण्यासाठी मसाला रॅक मिळतो. यात जवळपास १६ ते २४ जारचा संच मिळतो. यातील सर्व जार हे उच्च-गुणवत्तेचे बीपीए मुक्त आणि ग्रेड पीपी प्लॅस्टिकने बनलेले आहेत. तुमच्या किचनमध्ये वस्तू ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही, असे वाटत असेल तर हा आत्मनिवेदी स्टेनलेस स्टील थ्री लेअर किचन रॅक होल्डर तुमच्या उपयोगाचे ठरू शकतो. रॅकमध्ये तुम्ही किचन ओट्यावरील लागणारे छोटे मोठे साहित्य ठेवू शकता किंवा फळेदेखील व्यवस्थित ठेवू शकता.

कंटेनर जारचा सेट

स्वयंपाकघरात वस्तू ठेवण्यासाठी प्लॅस्टिकची बरणी ठेवत असाल तर लगेच बदला. त्याच्याजागी ग्लास जार वापरा. यामुळे कोणत्या जारमध्ये कोणत्या वस्तू आहे हे सहज समजेल. तसेच स्वयंपाकघरात ग्लास जार अतिशय सुंदर दिसेल. मिलानाचे एकूण सहा एअरटाइट कंटेनर जारचा सेट मिळतो. हे शंभर टक्के लीक प्रूफ असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com