'या' चार पध्दतींचा उपयोग करून करा पॅन्टॉन कलरचा मेकअपमध्ये समावेश

panton colours
panton colours

औरंगाबाद: 2021 मध्ये पॅन्टॉनने (कलर ट्रेंड सांगणारी संस्था) दोन कलर सुचवले आहेत. हे दोन्हीही कलर एकदम ताजेतवाने करणारे आहेत. अल्टिमेट ग्रे और इल्यूमिनेटिंग यलो हे सकारात्मक विचार आणि प्रोत्साहन देणारे दोन पॅन्टॉन कलर 'पॅन्टॉन कलर ऑफ द ईअर' ठरले आहेत. 

फॅशन तज्ज्ञांच्या मते या कलरची जोडी एकदम लाजवाब असून ती टिकाऊ आहे. ग्रे म्हणजे करडा कलर हा विनम्रता निर्माण करतो तर पिवळा म्हणजे यलो कलर सकारात्मकता आणि शक्ती देणारा कलर आहे. या दोन कलरचा तुमच्या वर्षभराच्या राहणीमानात कसा सामावेश कराल त्याबद्दल पाहूया.

काजळाची ग्रे पेन्सिल-
तसं पाहायलं गेलं तर आयलायनर हे काळ्या रंगाचंच जास्त वापरलं जातं. पण आता करड्या रंगाच्या आयलायनरची मागणी वाढू शकते. कारण या रंगाचे आयलायनर तुमचा लुक चांगलाच बोल्ड करेल. 

ब्राईट यलो नेल पॉलिश-
ही नेलपॉलिश तुमच्या नखांना चांगली सुंदरता आणेल. तुम्ही आतापर्यंत याचा तुमच्या मेकअप किटमध्ये समावेश केला नसेल तर तो तुम्ही करा. 

यलो आइलाइनर-
जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे आइलाइनर आवडत असतील तर हा आइलाइनर नक्की वापरून पहा. याचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात आहे.

कलर्ड हाइलाइटर-
क्लासिक शँपेन आणि गोल्ड शेडचे हाइलाइटर्स हे नेहमीच तुमच्या मेकअप किटचा भाग राहिले असतील. पण आता तुम्ही कलर्ड (यूनिकॉर्न) हाइलाइटर्सही एकदा वापरून पाहिला पाहिजे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चांगला ग्लो दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com