Beauty Tips: सॉफ्ट त्वचा हवीय, मग घरीच तयार करा Milk powder चे फेसपॅक

महिलांसाठी आम्ही असा फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे त्वचा अगदी सॉफ्ट होईल आणि ग्लो करू लागेल. शिवाय हा फेसपॅक घरच्या घरी अगदी सहज तयार करण्यासारखा आहे
मिल्क पावडर फेसपॅक
मिल्क पावडर फेसपॅकEsakal

सुंदर आणि निखळ त्वचा कुणाला नको असते. चेहऱा चांगला दिसावा. त्यावर कोणतेही डाग किंवा पिंपल्स असू नये. त्वचा Skin सॉफ्ट आणि चमकदार असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं.  त्वचा चांगली असेल तर महिलांमध्ये आत्मविश्वासही Self Confidence वाढतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला मग ब्युटी पार्लरच्या चकरा मारतात. Beauty Tips for fair skin make milk Powder pack at home

मात्र काही महिलांना दरवेळी पार्लरमध्ये जाणं शक्य होतं नाही. तर काही महिला बाजारातील वेगवेगळ्या क्रिम आणि फेसपॅक Face Pack आणून त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र दरवेळी या महागड्या क्रिम Cream घेणं परवडतं नाही. त्यापेक्षा घरच्या घरीच अगदी कमी किमतीत एखादा चांगला फेसपॅक तयार करता आला तर. Milk powder face pack  

महिलांसाठी आम्ही असा फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे त्वचा अगदी सॉफ्ट होईल आणि ग्लो करू लागेल. शिवाय हा फेसपॅक घरच्या घरी अगदी सहज तयार करण्यासारखा आहे. यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. तो म्हणजे मिल्क पावडर. होय मिल्क पावडरच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास तसचं चेहरा उजळण्यास मदत होईल.

लिंबू आणि मिल्क पावडर- हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे मिल्क पावडरमध्ये दोन चमचे लिंबाता रस आणि दोन चमचे दही मिसळा. तयार झालेली पेस्ट चेहऱ्याला १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. Lemon milk powder face pack

हळद, मध आणि मिल्क पावडर- जर तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहिश्या करायच्या असतील तर हा फेसपॅक तुमच्यासाठी आहे. कारण यातील अँटी एजिंग घटक तुम्हाला तरुण दिसण्यास मदत करेल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक वाटीमध्ये दोन चमचे मिल्क पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा हळद एकत्र करून घ्या. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा फेसपॅक नियमित लावल्याने काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. 

हे देखिल वाचा-

मिल्क पावडर फेसपॅक
Flour Face Pack : पिठाचा फेस पॅक असा बनवा घरच्या घरी, बघा कसा इस्टंट ग्लो येतो ते

ओट्स मिल्क पावडर- हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. यासाठी दोन चमचे मिल्क पावडर, दोन चमचे ओट्सची पावडर यात दोन चमचे संत्र्याचा रस मिसळा. त्यानंतर तयार पॅक चेहऱ्याला १५ मिनिटं ठेवा त्यानंतर चेहरा धुवा. ओटस् चेहऱ्यावरील डेट स्किन हटवण्यास मदत करेल. तर मिल्क पावडरमुळे चेहरा हायड्राट राहिल. हा पॅक नियमित लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल. Oats milk powder face pack benefits 

बेसन आणि मिल्क पावडर – एक चमचा बेसण घेऊन त्यात दोन चमचे मिल्क पावडर टाका आणि काही लिंबाचे थेंब टाका. हा फेसपॅक चेहरा उजळण्यास मदत करेल. 

मुलतानी माती आणि मिल्क पावडर- तेलकट त्वचेसाठी हा एक उत्तम फेसपॅक आहे. यासाठी एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा मिल्क पावडर यांची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचाही वापर करु शकता. हा फेसपॅक चेहऱ्याला १५ मिनिटांसाठी लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुवा. महिन्यातून दोन वेळा हा फेसपॅक वापरल्यास चांगला रिझल्ट मिळेल. 

मिल्क पावडर, दही आणि लिंबू- दूध पावडर, दही आणि लिंबू याचं मिश्रण चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास मदत करत. तसचं यामुळे चेहऱ्यावरील ग्लो आणि ताजेपण परत मिळवण्यास मदत होते. या फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक २० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा .त्यानंर चेहरा स्वच्छ धुवा. 

अशा प्रकारे मिल्क पावडरचे वेगवेगळ्या प्रकारे फेस पॅक बनवून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. चेहऱ्यावरील मुरुम नाहिसे करण्यापासून ते तत्वा तरुण बनवण्यासाठी मिल्क पावडर उपयोगी ठरते. मिल्क पावडरमध्ये लॅक्टिक ऍसिड मुबलक प्रमाणात आहे. तसच एक नैसर्गिक क्लिंझर म्हणूनही ती काम करते. Milk powder face pack benefits. मिल्क पावडरमध्ये असलेल्या विटामिन बी मुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा तरुण राहतो. त्यामुळेच घरच्या घरी कमी खर्चात त्वचा सॉफ्ट ठेवण्यासाठी मिल्क पावडर हा एक उत्तम पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com