Beauty Tips : निस्तेज चेहऱ्यावर प्रयोग करून थकला असाल तर गुलाबपाण्याचा असा करा वापर, चेहरा चंद्रासारखा चमकेल
Beauty Tips :
प्रत्येकीला तजेलदार आणि डागविरहीत चेहरा हवा असतो. त्यामुळे पार्लर आणि इतर ट्रिटमेंट केल्या जातात. या ट्रिटमेंटमुळे, काहीवेळा उलट परिणामही होतात. चेहरा उजळ होण्याऐवजी अधिकच निस्तेज होतो अन् पुरळनी भरतो.
निरोगी त्वचा आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. पण, गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही निरोगी आणि चमकदार त्वचा देखील मिळवू शकता. गुलाबजल त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी गुलाबपाणी कसे वापरावे. हे जाणून घेऊयात. (Beauty Tips In Marathi)
गुलाबपाण्याचे महत्त्व
गुलाबपाणी अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत आणि हे सर्व गुणधर्म निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी उपयुक्त आहेत. गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट करते आणि त्याचा योग्य वापर केल्याने त्वचेला चमक येते.
मुरुम आणि काळ्या वर्तुळाची समस्या कमी करण्यासाठी गुलाबजल उपयुक्त आहे. जर तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी गुलाबजल वापरत असाल तर त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात.
असा करा वापर (Rose Water For Skin Care)
तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणीचा वापर क्लिन्झर म्हणून करू शकता. कापसाच्या बोळ्याने थोडे गुलाब पाणी घ्या आणि चेहरा स्वच्छ करा. जर तुम्ही मेकअप लावला तर ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता.
फेस मास्क बनवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही फेस मास्क बनवू शकता आणि चेहऱ्यावर लावल्यास त्वचेशी संबंधित समस्या कमी होतील आणि चेहऱ्यावर चमकही येईल.
गुलाब पाण्याच्या मदतीने फेस मास्क बनवण्यासाठी तज्ञाची मदत घ्या. मॉइश्चरायझर म्हणूनही तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता गुलाबाने चेहऱ्याला मॉइश्चरायझ केल्याने त्वचा ओलसर राहते आणि चेहऱ्यावर चमकही येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.