Beauty Tips : थंडीच्या दिवसात घ्यायचीय त्वचेची काळजी? मग फॉलो करा सारा खानला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan beauty

Beauty Tips : थंडीच्या दिवसात घ्यायचीय त्वचेची काळजी? मग फॉलो करा सारा खानला

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कॅमेऱ्याच्या झगमगाटात असते. कॅमेऱ्यात कधीही तिचा चेहरा निस्तेज दिसत नाही. ती नेहमीच फ्रेश दिसते. यासाठी ती इतर अभिनेत्रींप्रमाणे डार्क मेकअप करत नाही. अगदी लाइट मेकअपमध्येही ती ग्लॅमरस दिसते.

हेल्दी स्कीन आणि चमकदार चेहरा ही तिची खासियत आहे. सारा त्वचेची खूप काळजी घेते आणि यासाठी तिचा होम रेमेडीजवर खूप विश्वास आहे. केसांची काळजी घेण्यासाठी ती नैसर्गिक तेलाची चंपी करते. सारा नेहमी तिच्या सोशल मीडिया पेजवर तिचे स्किन केअर रूटीन शेअर करते. येणाऱ्या हिवाळ्यासाठी तिने इंस्टाग्रामवर काही स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत.

गरम पाण्याने आंघोळ नकोच!

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणारे लोकही कडक पाणी घेतात. संसर्गजन्य रोगांच्या वातावरणात अनेक लोक सतत आंघोळ करतात. मात्र, अशाप्रकारे वारंवार गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्कीन कोरडी होते. त्यामुळेच सतत गरम पाण्याने अंघोळ न करण्याचा सल्ला सारा देते.

डिहाइड्रेशनपासून बचाव करा

हिवाळ्यात लोक पाणी कमी पितात. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शरीरात डिहाइड्रेशन होते. याचा परीणाम स्कीनवरही होतो आणि त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय स्वतला करून घ्या. त्याचसोबत नारळाचे पाणी, सूप आणि फळांचे रस देखील जास्त प्रमाणात घ्यावे, असेही सारा सांगते.

कपड्यांची निवड

थंडीपासून बचावासाठी लोक वुलनचे कपडे घालतात. मात्र, सतत हे कपडे वापरणे स्कीनसाठी चांगले नाही. साराचे असे म्हणणे आहे की, पुर्ण कपडे घालून मग त्यावर स्वेटर आणि जॅकेट घाला. कपडे घेताना मऊ आणि आरामदायक कपडे खरेदी करा.