esakal | सेंसिटिव्ह स्कीन आहे?; मग आय मेकअप करताना घ्या 'ही' काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Eye Kajal

सेंसिटिव्ह स्कीन आहे?; मग आय मेकअप करताना घ्या 'ही' काळजी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेक जणींना मेकअप करण्याची प्रचंड हौस असते. मात्र, सेंसिटिव्ह स्कीन असल्यामुळे अनेकदा त्यांच्या इच्छांना मूरड घालावी लागते. त्यातच सध्याच्या काळात आय मेकअप करण्यावर अधिक भर दिला जात आहे. अनेक स्त्रिया डोळे उठावदार दिसण्यासाठी आय मेकअप करतात. परंतु, अनेक जणींना सेंसिटिव्ह स्कीन असल्यामुळे इच्छा असताना सुद्धा आय मेकअप करता येत नाही. म्हणूनच, सेंसिटिव्ह स्कीन असलेल्या स्त्रियांना आय मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहुयात. (beauty-tips-simple-makeup-tips-for-sensitive-eyes)

१. ब्रश स्वच्छ करा -

आपली त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यामुळे कधीही आय मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणूनच, कधीही ब्रशने आय मेकअप करत असताना तो ब्रश स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण, ब्रशवर राहिलेल्या कॉस्मॅटिक्समुळे अनेकदा डोळ्यांना इंफेक्शन होऊ शकते.

२. क्रिमी शेडचा वापर करा -

ज्या स्त्रियांच्या डोळ्यांची त्वचा अतिसेंसिटिव्ह आहेत त्यांनी पावडर शेडऐवजी क्रिमी आयशेडोचा वापर करावा. तसंच शक्यतो शिमर आयशेडोचा वापर करणं टाळावं.

हेही वाचा: प्लाझोसोबत ट्राय करा 'हे' फूटवेअर; दिसाल एकदम कूल

३. जास्त आय मेकअप टाळावा -

अनेक स्त्रियांना डोळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत काजळ किंवा लायनर लावण्याची सवय असते. मात्र, त्यामुळे अनेकदा इंफेक्शन होण्याची शक्यता असते. तसंच अनेकदा डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे या समस्या निर्माण होतात.

४. मस्करा लावू नका -

डोळ्यांच्या पापण्या उठावदार दिसण्यासाठी अनेकजणी मस्करा लावतात. मात्र, मस्करामध्ये फायबरचा वापर केलेला असतो त्यामुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: शू बाईटचा त्रास सहन होत नाही

५. मेकअप रिमुव्ह करा -

अनेक जणी मेकअप रिमुव्ह न करता तसाच चेहऱ्यावर ठेवतात. त्यामुळे अनेकदा त्वचेशी संबंधित तक्रारी डोकं वर काढतात. म्हणूनच, कधीही चेहरा व डोळ्यांवरील मेकअप रिमुव्ह करावा. आय मेकअप रिमुव्ह न केल्यामुळे डोळ्यांची आग होणे, पाणी येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

loading image