Beauty Tips: या तिन गोष्टी तुमच्या पायांचा काळेपणा करतील दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Beauty Tips: या तिन गोष्टी तुमच्या पायांचा काळेपणा करतील दूर

आपण  आपल्या चेहऱ्याची जितकी काळजी घेतो तितकी आपण आपल्या पायांची काळजी घेत नाही, त्यामुळे मग पायांवर काळे डाग दिसू लागतात. त्यामुळे आपले पाय खूप वाईट दिसायला लागतात. तुमच्या पायाचे खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे मेलेनिनचे जास्त उत्पादन. मेलेनिन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे त्वचेला रंगद्रव्य देते. त्याच्या निर्मितीची प्रक्रिया त्वचेमध्ये असलेल्या मेलेनोसाइट्स पेशींमध्ये पूर्ण होते.

हेही वाचा: Vastu Tips : घरी राधा-कृष्णाचे चित्र कोणत्या दिशेला असावे? पहा काय सांगते शास्त्र..

तुमच्या त्वचेत मेलॅनिन जितके जास्त असेल तितकी तुमची त्वचा गडद होत जाते. पायावर ठिपके आणि काळे डाग म्हणजे त्या भागात मेलेनिन जास्त आहे. हे काळे डाग तुमच्या पायावर आणि शरीरावर कुठेही येऊ शकतात. बहुतेक वेळा आपण आपल्या पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण पेडीक्योरची मदत घेतो, पण अनेक वेळा पायांचा काळेपणा दूर होत नाही.

हेही वाचा: Vastu Tips : सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी पाहणं टाळावं?, काय सांगितलंय शास्त्रात?

जर तुम्हालाही असाच पायांच्या काळेपणाचा त्रास होत असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. एलोवेरा जेल, बेकिंग सोडा आणि मीठ यांचा वापर पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

हेही वाचा: Astro Tips: घरात पाल पडल्याने होतात 'या' 7 शुभ आणि अशुभ गोष्टी..

एलोवेरा जेल, बेकिंग सोडा आणि मीठ यांचा वापर कसा करावा आता ते बघू या..

● पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून चांगले मिसळून घ्यावे.

● हे मिश्रण पायांच्या काळ्या भागावर लाववी आणि पायाला मस्त मसाज करावी.

● या पॅकने 4 ते 5 मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून काढावे.

● पाय धुतल्यानंतर ते कोरडे करा आणि खोबरेल तेलाने पायाची मालिश करा.

● पायांची नियमित साफसफाई केल्याने पायांचा काळेपणा दूर होईल.

Web Title: Beauty Tips These 3 Things Will Remove The Blackness Of Your Legs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..