
कोल्हापूर: बेडरूम (Bedroom) घरातील एक अत्यंत आवश्यक भाग असतो अशा ठिकाणी आराम वाटावे ती स्टायलिश असावी यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. प्रत्येकाला आपलं घर सजवावे लागते अशा वेळी आपण फक्त ट्रायल रूम किंवा किचन (Trial room or kitchen) याकडेच लक्ष देऊन चालणार नाही. तर बेडरूमचे ही वेगळेपण असते. ही जागा आपली वैयक्तिक जागा असते ज्या ठिकाणी जास्त करून कोणीही येत नाही. यासाठी आपणास ज्या पद्धतीने कम्फर्टेबल वाटेल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आल्हाददायक वाटेल यासाठी आपल्या पसंतीने त्याची स्टाईल करणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी आपणास एक सकारात्मक ऊर्जा मिळते. ही जागा फक्त आपल्या झोपण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय स्वस्थपूर्ण असते. त्यामुळे या ठिकाणी आपणास आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याची उपलब्धता गरजेचे असते. तुम्ही घर सजवताना तुमच्या बेडरूमचा विचार करावा यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरतात. आपल्या बेडरूममध्ये पाच अशा गोष्टी आवश्यक आहेत ज्या सामान्य फर्निचर बरोबरच त्यांचीही आवश्यकता असते. चला तर जाणून घेऊया या पाच गोष्टी.
Here are five essentials for relaxation and styling in the bedroom tips marathi news
1) कार्पेट किंवा गालिचा:
कार्पेट किंवा गालिच्या आपल्या बेडरूमचा स्टायलिश पणा वाढवते. त्याचबरोबर आपल्या बेडला फोकस करत राहते. बेडरूममधील सर्व साहित्या बरोबर हे ही आपण मॅचींग करू शकतो. यासाठी आपण बोल्ड पॅटर्न सुद्धा वापरू शकतो. यामुळे बेडरूम अधिक उजळ होते. जर तुमचे बेड डार्क असेल तर कार्पेट गालीच्या फिक्कट रंगाचा असावा. यामुळे बेडरूमची जागा अधिक प्रशस्त दिसते. ही छोटीशी गोष्ट आपल्या बेडरूमचा लूक बदलून टाकतो.
2) आकर्षक दिवे:
बेडरूममधील प्रकाश व्यवस्था चांगली असेल तर तुम्हाला खोलीत प्रवेश केल्यानंतर आरामदायक वाटेल.थंडीमध्ये आपल्याला उबदारपणा मिळावा किंवा वाचन करताना आराम वाटावे अशा प्रकारच्या व्यवस्था आवश्यक असतात. आपल्याला दिवसा आणि रात्री दोन वेळा लाईट ची आवश्यकता असते. अशा वेळी एक बल्ब किंवा ट्यूबलाइट खोलीमध्ये चालत नाही. या खोलीमध्ये नैसर्गिक उजेडाची ही आवश्यकता असते. त्याचबरोबर खोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी ही सेंट्रल लाईट असणे आवश्यक आहे. खोलीच्या वेगवेगळ्या भिंतीवर छोटे छोटे बल्ब आपण लावू शकतो. हे बल्ब आपण वाचन करताना किंवा विश्रांती घेताना अल्हाददायक वाटतात. खोलीतील आरश्या जवळही एक बल्ब आवश्यक असतो.
3)योग्य पद्धतीचे चादर
: आपण ज्या गादीवर झोपतो ते पाठीसाठी आरामदायक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चादर आणि उशीचे कव्हर आरामदायक असणे आवश्यक आहे. आपण ज्या कापडावर झोपतो त्यामुळे आपल्या शरीराला एक वेगळे समाधान मिळते. मऊ तसेच नैसर्गिक कपडे ज्याप्रमाणे कॉटन लिनन यामधील बेडशीट आणि कव्हर आपल्या शरीराला आरामदायक ठेवतात.
4) सामान ठेवण्याची जागा :
बेडरूम स्वच्छ आणि सुंदर आवश्यकता असते त्याच बरोबर त्याची रचना ही योग्य रीतीने असली पाहिजे. यामध्ये सामान ठेवण्याची जागा अत्यंत आवश्यक असते. आपल्याला बेडरूममध्ये तेव्हाच आरामदायी वाटते जेव्हा सर्व साहित्य व्यवस्थित असते. कपडे, पुस्तके यासह लागणारे अन्य साहित्य ठेवण्यासाठी खोलीमध्ये कपाट हे आवश्यक असते. कपाट असेल तर खोली अधिक टापटीप वाटते. खोलीमध्ये अस्ताव्यस्तपणा असेल तर आपल्याला त्यामध्ये समाधान वाटत नाही. तुम्ही फोल्डिंग होणारे कपाट सुद्धा वापरू शकता. यामुळे बेडरूमला एक वेगळे लूक मिळून जाईल.
5) व्यक्तिगत साहित्य:
फोटो फ्रेम बाहेर जाताना लागणारे आवश्यक साहित्य, फोटो, आवडते फुल, आपल्याला पसंत पडलेली एखादी कलाकृती असे अनेक पर्सनल गोष्टी असतात. आपण ज्या वेळी बाहेरून येतो त्या वेळी अशा गोष्टी आपल्याला जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्याबाबतची एक वेगळीच मानसिकता असते आणि त्यामुळे आपले मन उल्हसित होते. या सर्व गोष्टी आपल्याला याची जाणीव करून देतात की बेडरूम ही फक्त झोपण्याची जागा नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनातील वेगळे ठिकाण असते. ते सजवण्याची जबाबदारी आपल्यावरच असते. तुम्हाला जर तुमची खोली अत्यंत कंफर्टेबल करायचे असेल तर या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या.
Here are five essentials for relaxation and styling in the bedroom tips marathi news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.