

Bedwetting in Children: Understanding Psychological Causes and Treatment
esakal
डॉ. मृदुला आपटे,क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
अंथरुणात लघवी होण्याची समस्या अनेक मुलांमध्ये आढळते; परंतु नेहमी त्याची कारणे शारीरिकच असतात असे नाही.
आर्यन बारा वर्षांचा होता. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याने कधीही अंथरुणात लघवी केली नव्हती. त्यामुळे अलीकडेच त्याचे कुटुंब नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर आर्यनने अंथरुणात लघवी केल्याचे पाहून आई-बाबांना जरा धक्काच बसला. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री त्याला थंडी वाजून अपवादात्मक स्थितीत असा प्रसंग घडला असावा, असा अर्थ आई-बाबांनी सुरुवातीला काढला. पण हळूहळू हा प्रकार वाढू लागला. आधी आठवड्यातून एकदा आणि नंतर ही घटना दोन दिवसांतून एकदा घडू लागली.