esakal | Coronavirus : फळं खरेदी केल्यावर तुम्ही नाही ना करत 'ही' चूक; नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

Fruits

फळं खरेदी केल्यावर तुम्ही नाही ना करत 'ही' चूक

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना (Corona) विषाणूचं संकट अद्यापही टळलेलं नाही. त्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वापरणे, हात सॅनिटाइज करणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणे ही तीन सूत्रे आवर्जुन अवलंबली पाहिजे तरच आपण कोरोना सारख्या असाध्य आजारावर मात करु शकतो. यामध्येच बाहेरुन कोणतीही भाजी किंवा फळं आणली तर ती व्यवस्थित स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच फळे, भाज्या खरेदी करताना काही मुलभूत गोष्टींकडेही लक्षं देणं आवश्यक असून खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे पाहुयात. (before buying fruits in corona period keep these things in mind)

कोरोना काळात खासकरुन लहान मुले व वृद्धांना फळे जास्तीत जास्त दिली पाहिजेत. त्यामुळेच फळे खरेदी करण्यापूर्वी हातात ग्लोव्हज आणि चेहऱ्यावर मास्क लावणं सक्तीचं आहे. तसंच फळं खरेदी करतांना सोशल डिस्टंसिंगकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. बाजारात जाऊ आल्यानंतर घराचा दरवाजा हाताने न उघडता कोपऱ्याने उघडावा. जर ते शक्य नसेल तर हाताने दरवाजा उघडल्यानंतर दरवाजाचं हॅण्डल सॅनिटायझरने स्वच्छ करावं.

'या' गोष्टींकडे द्या लक्ष

१. फळ किंवा भाजी विक्रेता व तुमच्यात ६ फूटांचं अंतर ठेवा.

२. शक्यतो कॅशलेस व्यवहार करा.

३. भाजीची पिशवी सॅनिटाइज करा.

४. भाज्या व फळे कोमट पाण्याने धुवाव्यात. त्यात थोडं मीठही टाकावं.

दरम्यान, अनेक जण बाजारातून कोणतीही वस्तू विकत आणली की ती लगेच वापरायला लागतात. परंतु, सध्याच्या काळात हे अत्यंत घातक आहे. तसंच फळे व भाज्यादेखील अनेक जण केवळ एकाच पाण्यातून धुवून घेतात. मात्र, भाज्या व फळे कोमट मीठाच्या पाण्याने धुणं गरजेचं आहे.

loading image