तुमची मुलगी १८ वर्षांची झालीय का? मोठी होताना तिला काय सांगाल?

या वयातल्या मुली अधिक चौकस नजरेने जग पाहण्यासाठी सज्ज असतात
mother daughter relation
mother daughter relation

अठरावं वरीस जपायचं... असं म्हटलं जातं. पण मुलगी ((Doughter)१८ वर्षांची झाल्यावर जास्त समजूतदार होते. तिला तिच्या आवडी निवडी (Likes) कळायला लागतात. शालेय शिक्षण (Education) पूर्ण करून ती महाविद्यालयीन (Collage) जीवनात प्रवेश करते. यावेळी त्यांना अचानक अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यांच्या कारकीर्दीवर (Education-jobs)अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना महत्त्वाची वेळ असते. पण आजच्या आधुनिक काळात सगळ्या आव्हांनाशी लढायला तिला तयार करणं आता आयांना खूप महत्वाचं वाटतं. १८ व्या वर्षांनंतर मुली बाहेरच्या जगात जास्त असतात. अशावेळी त्यांना काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. आयांनी अशा काही गोष्टींची माहिती मुलींना दिली पाहिजे. (Doughter Care Tips)

mother daughter relation
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल
Makeup
Makeup

या चार गोष्टींची माहिती द्या

स्वत:चे रक्षण (Self Care)

स्वत:चे रक्षण कसे करावे याची मुलींना बऱ्यापैकी माहिती असते. पण मोठी झाल्यावर हीच माहिती अधिक काळजीपूर्वक तिला दिली जावी. ट्रेनमधून प्रवास करताना अडचणीच्यावेळी तिच्याजवळ मसाला स्प्रे असावा. जेणेकरून अडचण आल्यास ती तो स्र्प्रे मारू शकेल.

मेकअप टिप्स (Makeup Tips)

कॉलेजमध्येही मुलींना नवीन मेकअप ट्रेंडनुसार कपडे तसेच हलका मेकअप करायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही मुलींना काही टिप्स द्याव्यात. ती मेकअप न करताही सुंदर दिसून शकते याची जाणीव करुन देणे, गरजेचे आहे. पण जर मेकअप करायचा असेल तर, स्वस्त मेकअप प्रोडक्स खरेदी न करणे, एक्सपायरी डेटची काळजी घेणे, त्वचेला शोभेल ते लावणे, प्रसंगानुसार बेस किंवा इतर गोष्टी निवडणे याकडे तिने कसे लक्ष द्यावे याचीही माहिती तिला असावी.

mother daughter relation
तीन वर्षांतच येतो जोडीदाराचा कंटाळा ?ब्रेकअपची काय आहेत कारणे
hairs
hairsesakal

स्वच्छतेची काळजी (Body Care)

स्वच्छता शरीरासाठी अत्यंत महत्वाची आहे. १८ व्या वर्षी मुली वॅक्सिंग, थ्रेडिंग, शेव्हिंग करतात. पण. मुलीला या पद्धतीबाबत सांगताना त्याची संपूर्ण माहिती द्या. उदाहरणार्थ, वॅक्सिंगमुळे होणारी पुरळ, शेव्हिंग ब्लेड्स साफ न केल्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग आदींची माहिती देत स्वच्छतेच्या गोष्टी तिला समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या आरोग्याबाबत आणखी सजग राहतील.

केसांची निगा (Hair Care)

कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलींना नवीन हेअरस्टाइल ट्राय करायला अतिशय आवडते. स्टाईलसाठी त्या अनेक प्रोडक्ट वापरतात. त्यांना फिल्टर करणे त्यांना आवडते. पण हे केल्याने केसांना खूप नुकसान होते, केस गळू शकतात. अशावेळी केसांची निगा राखण्यासाठी घरगुती किंवा नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे चांगले ठरते.

mother daughter relation
तुमची पाळी अनियमित येतेय? ही आहेत कारणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com