
सायली शिंदे - योगतज्ज्ञ
पोटावरील चरबी ही अनेक स्त्रियांची सर्वसामान्य तक्रार आहे. गर्भधारणा, हार्मोनल बदल, तणावपूर्ण जीवनशैली, आणि बैठं काम यामुळे पोटाभोवती चरबी साचते. यामुळे सौंदर्यावर परिणामाबरोबरच अनेकदा पचनाच्या तक्रारी, थकवा, आणि आत्मविश्वासात घटही जाणवते. योग्य योगासनं, संतुलित आहार, नियमित दिनचर्येमुळे यावर नियंत्रण मिळवता येतं.
नौकासन : जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ पुढे, मग हळूच वर उचलून ‘V’ आकार तयार करा. हात सरळ समोर. श्वास सोडत पाय हळूहळू खाली आणा आणि शरीर सैल सोडा. फायदे : पोटावरील स्नायूंना ताण मिळतो, चयापचय वाढतं.
भुजंगासन : पोटावर झोपून, हातांनी आधार घेत शरीराचा पुढचा भाग वर उचलावा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत परत खाली. फायदे : पोटावरचा ताण कमी होतो, पाठीचा कणा लवचिक होतो.