Lemon Benefits in Summer
Lemon Benefits in SummerSakal

Summer Tips: लिंबुपाणी प्या, कुल व्हा! चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

उन्हाळ्यात लिंबुपाण्यासारखे स्वस्त आणि मस्त पेयच नाही.
Published on

लिंबू हे किती गुणकारी आहे हे सर्वांना माहीत आहे. लिंबू आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे मात्र अनेक लोकांना माहीत नाही. लिंबू आणि पाणी एकत्र केल्यास अनेक फायदे होतात. सकाळच्या ब्रेकफास्टला ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी पिणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या संकटादरम्यान तर व्हिटॅमिन सीचा महत्वाचा स्त्रोत म्हणून याकडे पाहिल गेले. उन्हाळ्यात तर लिंबुपाण्यासारखे स्वस्त आणि मस्त पेयच नाही. घरी अथवा घराबाहेर असताना ते सहज उपलब्ध होते. याचे फायदे समजून घेतले पाहिजेत.

Lemon Benefits in Summer
Summer Care: उन्हाळ्यात जास्त फिट्ट कपडे घालाल तर होईल हे नुकसान; जाणून घ्या

असे फायदे होतात (Lemon Benefits in Summer)

  • ग्रीन टी बरोबरच लिंबू पाणी प्यायले तर त्वचेची लकाकी वाढते.

  • चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात.

  • शरीराचे वृध्दापकाळामुळे होणारे नुकसान टळण्यास मदत होते.

  • पचनसंस्था सुधारते.

  • कोमट पाण्याने रक्तशुध्दी होण्यास मदत होते.

  • मलावरोध कमी होतो.

  • शरीरातील अनेक प्रकारचे विष बाहेर फेकले जाते.

  • श्‍वासाचा दुर्गंध कमी होतो.

  • दातांचे दुखणे कमी होते.

  • हिरड्यातून रक्तस्राव कमी होतो.

  • लिंबातील पोटॅशियममुळे रक्तदाबाचा विकार आटोक्यात राहतो.

  • भूक मंदावली असेल तर ती वाढते.

  • मानसिक दडपण असेल तर ते कमी होते.

Lemon Benefits in Summer
Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या

असे प्यावे लिंबू पाणी-

  • लिंबू पाणी घेताना पाणी थंड घेऊ नये तर कोमट घ्यावे.

  • ग्रीन टी सोबत अथवा ग्रीन टी नंतर प्यावे.

  • सकाळच्यावेळी रिकाम्या पोटी प्यावे.

  • दररोजच्या जेवणात लिंबाची फोड खावी.

  • ब्लॅक टीमध्ये घेतल्यास फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com