

Benefits of Laughing: Health Advantages, Stress Relief & Well-being
esakal
Health Benefits of Laughter: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा लोक कामाच्या तणावामुळे हसणे किंवा खूश राहणे विसरून जातात. ताणतणाव घालवण्यासाठी महागड्या उपचारांचा किंवा औषधांचा आधार घेतला जातो. पण, यासाठी सर्वात स्वस्त, प्रभावी आणि नैसर्गिक औषध म्हणजे 'खळखळून हसणे' होय. हसल्यामुळे फक्त मूड लगेच सुधारत नाही, तर आरोग्याला अनेक थक्क करणारे फायदे मिळतात. लहान मुले दिवसातून शेकडो वेळा हसतात, पण मोठे झाल्यावर जीवन गंभीर होत जाते आणि हसणे कमी-कमी होत जाते. हसण्याचे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम अतिशय सकारात्मक आहेत.