Rose Water : थंडीत त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर गुलाब पाणी

गुलाब पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात
Rose Water
Rose Watersakal

थंडीच्या (Winter)दिवसात स्किन (Skin) खूपच खराब दिसू लागते. चेहरा खूप ड्राय दिसतो. अशावेळी तुम्ही गुलाबजल (Rose Water) वापरू शकता. गुलाबजल हे एक असे प्रोडक्ट आहे जे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तुम्ही घरगुती फेस पॅक किंवा स्क्रबमध्ये याचा वापर करु शकता. गुलाब पाणी त्वचेला थंड ठेवते. नियमित याचा वापर केलात तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. केवळ स्किनच नाही तर केसांना देखील याचा फायदा होतो.

केसांसाठी वरदान: गुलाब पाणी केसांमध्ये साचलेले अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. याचा फायदा तुम्हाला स्कल मॉइश्चरायझ होण्यासाठी होतो. याचबरोबर केसांची मुळे मजबूत करते. केसांना पुरेसे पोषण मिळते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. गुलाब पाण्याच्या वापराने कोरड्या आणि कुरळ्या केसांनाही सौंदर्य येते.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर: गुलाबपाणी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याचे कोणतेही साईडइफेक्ट होत नाहीत. तुम्ही याचा वापर नियमित केला तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

पीएच बॅलेन्स करते: थंडीच्या दिवसात स्किन खूप कोरडी होते. त्यामुळे पीएच बॅलेन्स करण्यासाठी याचा जादा फायदा होतो. खासकरून तेलकट चेहऱ्यासाठी हे जास्त फायदेशीर आहे. तुमच्या चेहऱ्याला जास्त छिद्रे असतील तर दिवसातून एकदा तरी गुलाब पाण्याने चेहरा धुवा छिद्रे साफ होतील.

मॉइश्चरायझर: गुलाबपाणी चेहऱ्याला मॉइश्चरायझरचे काम करतात. गुलाबपाणी चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात. गुलाब पाण्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या पेशी मजबूत करतात ज्यामुळे त्वचा कोरडी दिसत नाही. कधी-कधी चेहऱ्यावर बारीक कट असलेल्या रेषा दिसतात त्यादेखील कमी करण्याचे काम गुलाबपाणी करते.

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध: गुलाब पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हिवाळ्यात मुरुम आणि एक्जिमासारखे आजार उध्दभवतात. गुलाबपाणी जखमा भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. गुलाबपाण्याच्या वापराने त्वचा दीर्घकाळ तरूण राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com