esakal | World Smile Day : हसतांय ना? हसायलाच पाहिजे! कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

smile day

World Smile Day : हसतांय ना? हसायलाच पाहिजे...

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवलांय किंबहुना हसायचाच विसरून चाललांय. सांगायचं झालं तर...आयुष्यातील ताणतणाव आणि दगदग नेहमीचंच झालंय. पण त्यातून थोडासा वेळ काढून खळखळून हसलो तर..त्याचा उत्तम परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हो हे खरं आहे. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर साजरा केला जाणारा दिवस म्हणजे जागतिक हास्य दिन (world smile day)...

सकारात्मक वाटेल

सतत हसत राहिल्यास माणसाचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच सकारात्मक विचारसरणी मुरत जाते. माणूस अत्यंत आनंदात उर्वरित आयुष्य जगतो.

३२ पेशी मुक्त होतात

हसताना आपल्या चेहऱ्यावरील ३२ पेशी मुक्त होतात. त्यामुळे शहरातील तणावाचे हार्मोन्स कमी होतात. छोट्या-छोट्या गोष्टींचा तणाव येत नाही आणि माणूस दीर्घायुषी होतो.कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवाण्यास मदत
हसत राहिल्यास कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. मेंदूतील डोपामाइन ग्रंथी मुक्त होतात. यामुळे हृदयविकार, रक्तदाबसारख्या कितीतरी आजारांचा धोका कमी होतो.
ताणतणाव आणि दगदग विसराल


ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. विविध लाफ्टर क्लबतर्फे नेहमीच हा संदेश दिला जातो. आनंदी जीवनाचा मूलमंत्र असलेल्या हसण्याचा आनंद अनुभवता येतो.

शुगर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात
चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहतो.

कामाची गुणवत्तासुद्धा वाढेल
हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते.

loading image
go to top