Safest City for Women 2025: 2025 मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वाधिक अनुकूल शहर ठरलं बेंगळुरू, 125 शहरांच्या अभ्यासातून निष्कर्ष

Bengaluru Ranked Best City for Women in India in 2025: 125 शहरांच्या अभ्यासानुसार 2025 मध्ये महिलांच्या सुरक्षितता, सुविधा आणि करिअर संधींसाठी बेंगळुरू भारतातील सर्वाधिक अनुकूल शहर ठरले आहे.
Safest City for Women in India 2025

Bengaluru Becomes Best City for Women in India 2025

sakal

Updated on

Bengaluru Tops 2025 List of Most Women-Friendly Cities in India: गेल्या अनेक वर्षांपासून महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. घर असो वा सार्वजनिक ठिकाणे, महिलांना कुठेही पूर्ण सुरक्षित असल्याची भावना राहिलेली नाही, अशीच वस्तुस्थिती अनेकदा दिसून येते. मात्र या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. 2025 मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि अनुकूल शहर म्हणून बेंगळुरूला अव्वल स्थान मिळाले आहे.

चेन्नईस्थित महिलांसाठी समावेशकतेवर काम करणाऱ्या ‘अवतार’ या संस्थेने तयार केलेल्या निर्देशांकातून हा निष्कर्ष समोर आला आहे. या अभ्यासात देशभरातील 125 शहरांचे मूल्यमापन करण्यात आले असून, महिलांना उपलब्ध असलेल्या सामाजिक सुविधा, सुरक्षितता, तसेच रोजगाराच्या संधी यांचा सविस्तर विचार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com