

haldikunku vaan
esakal
वर्षाचा पहिला सण म्हणजे 'संक्रांत'. २०२६मध्ये १४ जानेवारी रोजी संक्रांत आलीये. संक्रांतीला भोगीची भाजी बनवून सुगड पुजून सुवासिनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सोबतच या दिवशी बऱ्याच स्त्रिया घरात हळदीकुंकू करतात. सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळदीकुंकू लावून सौभाग्याचं वाण म्हणून एखादी वस्तू देण्याची पद्धत आहे. मात्र आता संक्रांतीला अगदीच कमी दिवस उरलेत. काही स्त्रियांनी वाण आणलंही असेल. मात्र अजूनही तुम्ही जर वाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बाजाराऐवजी तुमच्या जवळच्या डीमार्टमध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीत उत्तम वस्तू मिळू शकतात.