Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

betel leaves

Healthy Lifestyle: जेवणानंतर पान खायला आवडतं? मग हे वाचाच

भारतात पानाचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूजेदरम्यान विड्याचे पान शुभ मानले जाते. अनेक लग्न समारंभातही पान आवर्जून खाल्ले जाते. अनेकांना जेवल्यानंतर पान खाण्याची सवय असते पण जेवणानंतर पान खाणे चांगले की वाईट? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

जेवल्यानंतर पान खाणे चांगले की वाईट?

  • जेवल्यानंतर पान खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. शरीराला अन्न पचण्यास मदत होते.

  • याशिवाय पोटदुखी, गॅस आणि छातीत जळजळ या समस्या कमी होतात.

  • विवाहित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी पान खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पानामुळे पुरूषांमधील लैंगिक शक्ती वाढते.

हेही वाचा: Curry Leaves : कढीपत्त्याची पानं चघळल्यामुळं होतो भरपूर फायदा, जाणून घ्या कसं

  • पान अँटिऑक्सिडंट घटक म्हणूनही काम करते. दुखापत झालेल्या ठिकाणी पानांचा रस लावावा त्यामुळे जखम लवकर भरते.

  •  रात्री जेवणानंतर पान खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

  •  पानातील चुना हा कफ आणि वाताचा त्रास कमी करतात.

टॅग्स :lifestylehealth