Bhaubeej | असा वाढेल भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaubeej

Bhaubeej : असा वाढेल भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा

मुंबई : दरवर्षी दिवाळीनंतर दोन दिवसांनी भाऊबीज साजरी केली जाते. यंदा भाऊबीज २६ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा होत आहे. भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. भाऊ-बहीण एकमेकांचे पहिले मित्र असतात.

अनेकदा भांडणं होत असली तरी कठीण प्रसंगी ते कायम एकमेकांसोबत असतात. भाऊ-बहिणीचं नातं आंबट गोड असतं. पण अनेक वेळा अनेक मतभेद, वारंवार होणारी भांडणं, नोकरी किंवा लग्न यामुळे एकमेकांना वेळ देता न आल्यानं लहानपणीच्या काळात असलेल्या भावंडांच्या नात्यात गोडवा नसतो.

अशा परिस्थितीत भावा-बहिणीचं नातं कायमचं घट्ट आणि आपुलकीचं करण्यासाठी काही मार्ग आहेत, ज्याचा अवलंब सगळ्यांनीच करायला हवा.

प्रत्येक भावंडांनी एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. व्यग्र जीवनशैली आणि करिअरमुळे भावंडं एकमेकांना फारसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्यात बरेच दिवस काहीच बोलणं होत नाही. अशा वेळी त्यांच्यात अंतर येऊ लागते.

भावंडांमध्ये आसक्ती असली, तरी एकमेकांना भेटल्यावर त्यांना मोकळेपणाने बोलता येत नाही. त्यामुळे भावंडांनी एकमेकांशी बोलत राहिले पाहिजे. दूर असाल तर आठवड्यातून एक-दोनदा फोन करून नात्याचा गोडवा कायम ठेवता येतो.

आपल्याशी असलेल्या कोणत्याही नात्यासाठी एकमेकांना आधार देणे महत्वाचे आहे. भाऊ-बहिणीने प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांना साथ दिली पाहिजे. एकमेकांना मदत करणे हा बहिण-भावाचा अधिकार आहे.

लहानपणी जसं तुम्ही तुमच्या भावंडांना बाहेरच्या मुलांपासून वाचवत असत. गर्दीत एकमेकांचा हात धरून त्यांना हरवण्यापासून वाचवायचे. तुम्ही मोठे झाल्यावरही तीच भावना जपा आणि गरजेच्या वेळी एकमेकांना आधार द्या.

नातं गहिरं आणि आपुलकीचं व्हावं यासाठी एकमेकांचा प्रत्येक लहान-मोठा आनंद साजरा करा. भावंडं एकमेकांपासून दूर असतील तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन गिफ्ट पाठवून तुम्ही हे नातं खास बनवू शकता.

अनेकदा लहानपणी भावंडांमध्ये जेवढा संबंध असतो, तेवढा आपुलकीचा आणि वृद्धत्वाशी संबंध येत नाही. याचं एक कारण म्हणजे तुमचं व्यग्र वेळापत्रक किंवा तुमच्या वागण्यात होणारे बदल आणि वयानुसार प्राधान्यक्रमात होणारे बदल. अशावेळी वेळोवेळी भावंडांनी एकत्र बसून त्या जुन्या आठवणी, त्या कथा ताज्या कराव्यात.

टॅग्स :Diwali Festival