

bollywood inspired black saree looks:
Sakal
bollywood inspired black saree looks In Makar Sankranti: मकर संक्रातीला काळी साडी नेसणे ही फक्त परंपरा नाही तर ते एक एलिगन्स, आत्मविश्वास आणि रॉयल अंदाजाचं प्रतीक मानले जाते. बॉलिवूड अभिनेत्रींच्या काळ्या साडीतील लूकने नेहमीच फॅशनप्रेमींना भुरळ घातली आहे. साधी साडी असो वा डिझायनर, योग्य स्टाइलिंग केल्यास काळी साडी तुमचा संपूर्ण लूक बदलू शकते. लाइट मेकअप, स्टेटमेंट दागिने आणि परफेक्ट ब्लाऊज डिझाइन यामुळे काळ्या साडीला बॉलिवूड टच मिळतो. सण-समारंभ, पार्टी किंवा खास कार्यक्रमात काळी साडी परिधान केल्यास तुम्ही नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घ्याल. आजकाल पारंपरिक आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर संगम काळ्या साडीत पाहायला मिळतो. त्यामुळेच काळ्या साडीतला हा एलिगंट अन् रॉयल लूक तुम्हाला वेगळं आणि खास बनवतो. यंदा संक्रातीत तुम्हाला बॉलिवूड टच हवा असेल तर पुढील अभिनेत्रींकडून आयडिया घेऊ शकता.