esakal | थांबा ! मुला-मुलींनो तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला या 4 मेडिकल टेस्ट करायला हव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

If you want to calm your partners anger after an argument follow some tips

लग्नाआधी काही मेडिकल टेस्ट तुमच्या पार्टनरच्या आरोग्यास आणि गरजा जाणून घेण्यासाठी खूप उपयुक्त असतात, असे 4 टेस्ट जाणून घ्या.

थांबा ! मुला-मुलींनो तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला या 4 मेडिकल टेस्ट करायला हव्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे :  हिवाळा सुरु होत आहे. हिवाळ्याच्या दिवसात लग्नसराई सुरु होते. लग्नासाठी मित्र आणि नातेवाईकांची यादी तयार करण्यापासून स्वत: साठी शेरवानी आणि लेहेंगा शोधण्यापर्यंत अशा बर्‍याच गोष्टी असतात ज्या आपण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विसरून जातो. बरेच लोक पंडितांकडे जातात आणि त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल याबद्दल माहितीसाठी कुंडल्यांमध्ये जाणून घेतात.  

या सर्व बाबींशिवाय निरोगी आणि आनंदी नात्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नवविवाहित जोडप्याचे आरोग्य. आपले आयुष्य एखाद्याबरोबर व्यतीत करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल आपल्याला माहिती असणे खूप महत्वाचे असते. म्हणून जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या तयारीत बिझी असाल तर मग थोडा वेळ काढून चार मेडिकल टेस्ट करा म्हणजे तुमच्या आनंददायी जीवनात अडथळे येणार नाहीत. 

इनफर्टिलिटी टेस्ट (वंध्यत्व चाचणी)

इनफर्टिलिटी टेस्ट ही  प्रजनन अवयवांच्या आरोग्य आणि (स्पर्म) शुक्राणूंची संख्या याबद्दल माहिती देणारी टेस्ट आहे. वंध्यत्वाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसल्यामुळे या टेस्ट घेणे आवश्यक आहे. जेणेकरून जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर तुमचं नातं सुखद राहील.  टेस्टमध्ये अशी कोणतीही माहिती उघडकीस आल्यास, जी तुमच्या प्लॅनला हानी पोहोचवू शकते अशावेळी तुम्ही योग्य वेळीच उपचार घेणे कधीही उत्तम राहील. 

ब्लड ग्रुप कंपैटिबिलिटी टेस्ट (ब्लड ग्रुप सुसंगतता चाचणी)

ही टेस्ट भलेकी तुम्हाला फारशी गरजेची वाटत नसेल, परंतु जर तुम्ही बाळासाठी प्लॅन करत असाल तर ही टेस्ट खूप महत्वाची आहे. या टेस्टद्वारे तुम्ही आणि तुमच्या पार्टनरचा आरएच घटक (फॅक्टर) निश्चित करून दोघांमध्ये बाळासाठी समान घटक (फॅक्टर) असणे आवश्यक आहे. जर तुमच्या दोघांचे रक्त गट (ब्लड ग्रुप) एकमेकांशी सुसंगत नसतील तर गर्भधारणेदरम्यान समस्या उद्भवू शकतात. ही समस्या तुमच्या दुसर्‍या मुलासाठी आणखी प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते कारण अशी परिस्थिती उद्भवली जाऊ शकते. ज्यामध्ये गर्भवती महिलांच्या रक्तात असलेल्या अँटी-बॉडी त्यांच्या मुलाच्या रक्तपेशी नष्ट करू शकतात.

अनुवांशिक (जेनेटिक) प्रेषण स्थिती तपासणी

अनुवांशिक स्थिती एका पिढीकडून दुसर्‍या पिढीमध्ये सहजपणे प्रसारित होत जाते. म्हणूनच हे फार महत्वाचे आहे जे या रोगाबद्दल सुरवातीलाच समजून घेतल्या पाहिजे. जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन उशीर होणार नाही. ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग), कोलोन कॅन्सर (कोलन कर्करोग), किडनी (मूत्रपिंड) रोग आणि डायबिटीज (मधुमेह) यासह काही रोगांचा समावेश केला पाहिजे. वेळेवर निदान केल्यामुळे या वैद्यकीय परिस्थितींसाठी योग्य उपचार करण्यात मदत होऊ शकते कारण ते नंतर तुमच्यासाठी प्राणघातक सिद्ध होऊ शकते. 

एसटीडी टेस्ट

सध्या विवाहापूर्वीच संबंध ठेवणे सामान्य बाब बनली आहे. त्यामुळे दोघांनासुद्धा लैंगिक आजारांची तपासणी करणे ही गरजेचे असेल. या आजारांमध्ये एचआयव्ही / एड्स, नागीण, उष्णता आणि हिपॅटायटीस सीचा समावेश आहे. यापैकी काही वैद्यकीय परिस्थिती जीवघेणा आणि आयुष्यभराची असल्याचे सिद्ध होऊ शकते म्हणून एसटीडी चाचणी करणे आवश्यक आहे. जर तुमच्या पार्टनरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो तुम्हाला मानसिक आघातापासून वाचवू शकतो, ज्याचा तुम्ही भविष्यात सामना करू शकता. यामुळे तुम्हाला एक संकेत मिळू शकते जेणेकरून पुढे जाऊन तम्ही लग्नासाठी विचार करू शकता कि नाही

टीप 

वर दिलेल्या या माहितीची अचूकता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले गेले आहेत. तरीसुद्धा कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.

loading image