Relationship Tips : मुलांनो ! लग्नासाठी मुलगी शोधण्याआधी या गोष्टी समजून घ्या; तरच टिकेल नातं

बायको नोकरी करत असेल तर ऑफिसला जाण्याआधी आणि परत आल्यानंतर घरची सगळी कामं तिने एकटीनेच करावीत अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.
Relationship Tips
Relationship Tipssakal

मुंबई : आताच्या पिढीतील महिला नोकरी किंवा व्यवसाय करतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे घरकामाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकणे चुकीचे ठरते. अशा वेळी आताच्या पिढीतील तरूण मुलांनी पत्नीच्या बरोबरीने सर्व जबाबदाऱ्या उचलणे अपेक्षित असते.

लग्नाच्या प्रक्रियेत उतरण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची मानसिक तयारी करून ठेवली तर पुढे नात्यात दुरावा निर्माण होत नाही.

घरातील कामे करणे

बायको नोकरी करत असेल तर ऑफिसला जाण्याआधी आणि परत आल्यानंतर घरची सगळी कामं तिने एकटीनेच करावीत अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुम्ही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ती तुमच्यापेक्षा घरातील कामात चांगली असूही शकेल, परंतु ती सकाळ-संध्याकाळ न थांबता काम करणारी मशीन नाही.

घराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुम्हा दोघांना घ्यावी लागेल, मग ते गृहकर्ज असो किंवा कपडे धुण्याचं काम असो. असे केल्याने नोकरी करणार्‍या पत्नीशी तुमचे संबंध नेहमीच चांगले राहू शकतात.

मुलाची जबाबदारी एकत्रितपणे उचलावी लागेल

एखाद्या मुलाला जगात आणण्यासाठी पुरुष आणि स्त्री दोघांचीही गरज असते. त्याचप्रमाणे त्याची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी आहे. बहुतेक पुरुषांना बालसंगोपनात फारसा रस नसतो. परंतु तरीही मुलाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीच्या पाठीशी उभे राहाणे आवश्यक आहे. विशेषतः जर तुमची पत्नी काम करणारी महिला असेल तर.

एकट्याने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही

नोकरदार महिला अनुभवात कोणाहूनही कमी नसते. कारण तिच्या करिअरमध्ये पुढे जाताना तिने अशा अनेक प्रसंगांचा सामना केलेला असतो, ज्या कदाचित पुरुष स्वतः कधीच करत नाहीत.

अशा वेळी घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय आपणच घ्यायचे आणि तिने होकार द्यावा असे मानणे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या दोघांमध्ये फक्त संघर्ष होईल आणि अंतर येईल.

नोकरी सोडण्याची अपेक्षा ठेवू नका

अनेक वेळा असे घडते की पुरुष नोकरी करणाऱ्या महिलांशी विवाह करतात. पण जेव्हा घरची कामे त्यांना करावी लागतात तेव्हा ते पत्नीने काम सोडावे अशी अपेक्षा ठेवतात.

काही महिला कुटुंबासाठी नोकरी सोडत असल्या तरी तो त्यांचा नाइलाज असतो. तुम्हाला चांगला पती बनायचे असेल तर बायकोवर नोकरी सोडण्याची वेळ कधीच येऊ देऊ नका.

प्रेमासोबतच आदरही आवश्यक आहे

नोकरदार महिला इतर महिलांप्रमाणेच भावनिक असतात. पण यासोबतच प्रत्येक परिस्थितीला एकटीने सामोरे जाण्याची ताकदही त्यांच्यात असते. त्यामुळे नात्यात योग्य तो आदर न मिळाल्यास आपल्या स्वाभिमानासाठी ती तुम्हाला सोडून जाऊ शकते. त्यामुळे प्रेमासोबत तिला आदरही द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com