Breast Cancer: महिलांमध्ये तिशीतच ब्रेस्ट कॅन्सरचा वाढला धोका, अशी घ्या काळजी

Breast Cancer: उशिरा लग्न, बाळाला स्तनपानाचा अभावामुळे 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढला आहे.
Breast Cancer
Breast CancerSakal

breast cancer is increased by 30% in women how to Take care yourself

काही वर्षांपूर्वी वयाच्या साठीनंतर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) आढळायचा. मात्र, आता वयाच्या तिशीतच ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. राज्यात ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांत 10 टक्के रुग्ण 30 ते 35 वयोगटातील असल्याचे सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या पाहणीत आढळून आले आहे.

अनुवंशिकता, शिक्षण व नोकरीमुळे उशिराने होणारे लग्न, अतिरेकी गर्भनिरोधकाचा वापर, बाळाला स्तनपानाचा अभाव यामुळे तिशीतच ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यामागची कारणे शोधण्यासाठी राज्य सरकारने आठ डॉक्टरांची समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत ब्रेस्ट क्लिनिक सुरू करणे, ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृतीसह विविध उपाय सुचविले आहेत.

महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशयाचा, मोठी आतडी, अन्ननलिका, तोंड, घशाचे आदी 640 प्रकारचे कॅन्सर आढळतात. महिलांत व्यसनाधीनतेअभावी तोंड, घशाच्या कॅन्सरचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी असले तरी मेट्रो शहरांत सिगारेट, गुटखा, मावा, हुक्का या व्यसनांमुळे तेथे त्याचेही प्रमाण वाढत आहे. तर कमी वयात स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. व्यायामाचा अभाव, फास्टफुडच्या अतिरेकामुळे वाढणारा लठ्ठपणा, प्रदूषित आहार व पाणी ही यामागची कारणे आहेत. तर 60 टक्के कॅन्सर 100 टक्के बरे होऊ शकतात, असे कॅन्सरतज्ज्ञांचे मत आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी महिलांनी स्तनांची तपासणी करून घ्यावी. मासिक पाळी बंद झाल्यानंतर पॅपस्मेअर तपासणी करून घ्यावी. स्तनात गाठ, वाढते रक्तस्त्राव, उलटी, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, कारण नसताना ताप येणे ही काही कॅन्सरची लक्षणे आहेत. भीती, लाज न बाळगता वेळेत डॉक्टरकडे जाऊन पूर्ण उपचार घेतल्यास कॅन्‍सर बरा होऊ शकतो.

  • कॅन्सर टाळण्यासाठी घ्या काळजी

पुरेसा व्यायाम करा.

रोज सात-आठ तास झोप घ्या.

संतुलित, सात्त्विक चौरस आहार घ्या.

शारीरिक स्वच्छता पाळा.

व्यसनांपासून दूर राहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com