
सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. ज्यांच्या घरी मुलीचे लग्न आहे त्यांची तयारी जरा वेगळीच असते. कारण, नवरदेवाचे कपडे, शूज, फेटा अशा वस्तू झाल्या की नवरदेव तयार होतो. मात्र, नवरीच तसं नसतं. नवरी मुलीचा मेकअप, लग्नाआधी बरीच तयारी असते. पण, काही मुली या कॉलेज,जॉबमध्ये इतक्या गुंग असतात. की, ज्यामुळे त्यांना मेकअपबद्दलच्या गोष्टी माहिती नसतात.
लग्नाच्या तयारीत एक महत्त्वाची गोष्ट असते, ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात आणि ती म्हणजे वधूचा मेकअप. वधूच्या मेकअप किटमध्ये एकही गोष्ट नसेल तर नवविवाहित वधूला खूप त्रास होऊ शकतो. ब्रायडल मेकअपमध्ये असलेल्या बेसिक गोष्टी प्रत्येकीला माहिती असतात. मात्र, परफेक्ट मेकअपसाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती नसतात.