
फ्लॉवर पॉट्सचा वापर करून घरांना सुंदर बनवता येतं. ‘फुलं नसलेलं घर म्हणजे आत्मा नसलेला मनासारखं’ असं जगप्रसिद्ध चित्रकार व्हिसेंट व्हॅन गॉग म्हणत असत. घरातल्या रचनेत नंतर आपल्यालाच अनेकदा तोचतोचपणा जाणवतो, तो दूर करण्यासाठी आणि निसर्गाची जोड देण्यासाठी फ्लॉवरपॉट्सचा प्रभावी वापर करता येतो. योग्य फुलं, पानं पॉट्सचं डिझाइन आणि मांडणीचा कल्पक मेळ घालून तुम्ही तुमच्या स्पेसला, कोणत्याही बजेटमध्ये इको-फ्रेंडली आणि ट्रेंडी लूक देऊ शकता. फ्लॉवर पॉट्सच्या वापराबाबत काही कानमंत्र बघूया.