
हे दुकान मुंबईमध्ये असून तुम्ही आरामात लोकलने या ठिकाणी पोहोचू शकतात, दुकान क्र. ४१७-४१९ या क्रमांकाचे हे दुकान आहे. बादशाह कोल्डड्रिंक्स जवळ, शेख मेमोन रोड, काळबादेवी मुंबई हा इथे पोहोचण्याचा पत्ता आहे.
Budget Friendly Fashion : आलिया भट्टचा एवढा महागडा श्रग इथे मिळतोय फक्त १०० रुपयांत!
Budget Friendly Fashion :आलिया भट्ट आपल्या क्युट फॅशन स्टाइलने नेहमीच तरुण मुलामुलींच्या मनावर अधिराज्य गाजवत असते, तिचे पार्टीवेअर ड्रेसेस तर भन्नाट असतातच पण तिचे चित्रपटात केलेले लुक सुद्धा खूप चर्चेत असतात. डियर जिंदगी मधले तिचे ड्रेसेस तर सगळ्यांनाच खूप आवडणारे आणि खरंतर आजच्या यूथला जास्त रिलेट करणारे होते.
बाजारात या श्रगची किंमत खूप महाग आहे, ऑनलाइन जरी बघितलं तरी जवळजवळ ४०० ते ५०० रुपयांत हा श्रग मिळतो पण हाच क्रोशेटचा विणलेला सुंदर श्रग मुंबईच्या या ठिकाणी खूप स्वस्तात मिळतो आहे. बघूयात नक्की कुठे?

Budget Friendly Fashion:
या दुकानात क्रोशेटच्या छोट्या टीज पासून लॉन्ग श्रगपर्यन्त सगळंच मिळतं आहे, शिवाय जर तुम्ही शरीराने हेल्दी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा इथे कपडे उपलब्ध आहेत. हे दुकान पूर्णपणे फक्त असे श्रग विकत आहे.
नक्की कुठे आहे हे दुकान