

Hair Care Tips for Dandruff | Ayurvedic Home Remedies
sakal
AYURVEDIC HOME REMEDY FOR DANDRUFF: केस नीट न धुणे, सतत धूळ-मातीच्या संपर्कात येणे, थंडीचे दिवस किंवा काही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. कोंडा वाढला की आपण लगेच महागडे शॅम्पू, वेगवेगळी हेअर प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. एवढंच नाही तर कोंडा कमी करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा वेगवेगळे ट्रीटमेंट्सही करून घेतो. पण प्रत्येक वेळी या उपायांचा परिणाम जास्त काळ टिकेलच असं नाही.