
Jewelry shopping mistakes: सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. अशावेळी सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे प्रत्येकासाठी खूप कठीण झाले आहे. यामुळे लग्नाच्या निमित्ताने महिलांना जुळणारे आर्टिफिशिअल दागिने घालणे अधिक आवडत आहे.
आजकाल आर्टिफिशिअल दागिने घालण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. ते केवळ स्टायलिश आणि परवडणारेच नाही तर तुम्ही ते प्रत्येक पोशाखासोबत सहज कॅरी करू शकता. कृत्रिम दागिने ऑफलाइन आणि ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत, परंतु योग्य आणि टिकाऊ आर्टिफिशिअल दागिने खरेदी करण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.