

Summer Fruit Shopping Tips:
Sakal
Best way to pick ripe watermelon in summer: उन्हाळा सुरू झाला की बाजारात लालसर, रसाळ कलिंगडांची रेलचेल दिसू लागते. शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे हे फळ जवळजवळ प्रत्येकाच्या घरात आवडीने आणले जाते. मात्र, आजकाल केवळ लाल आणि आकर्षक दिसणारे कलिंगड नेहमीच नैसर्गिक आणि सुरक्षित असेलच असे नाही.
काही ठिकाणी फळ लवकर पिकवण्यासाठी किंवा अधिक गोड होण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. जे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य आकार, वजन, सालावरील डाग, आवाज यांसारख्या गोष्टी तपासल्यास तुम्ही गोड आणि केमिकल-फ्री कलिंगड खेरदी करु शकता.